Mahayuti | नाशिकच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीत आणखी एका महंतांची उडी

0
48
Mahayuti
Mahayuti

Mahayuti | नाशिक लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून महायुतीत अजूनही रस्सीखेच सुरू असून, दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण होऊन 29 एप्रिलला ते उमेदवारी अर्जही दाखल करणार आहेत. मात्र, अजूनही महायुतीत या जागेचा तिढा सुटलेला नसून, रोज नवनवीन नावं समोर येत आहेत. दरम्यान, येत्या 24 तासांत हा तिढा सुटेल अशी शक्यता असतानाच आता आणखी एका इच्छुक उमेदवाराने भाजपकडून नाशिक लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.(Mahayuti)

कालपासून राष्ट्रवादीचे सिन्नर लोकसभेचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे नाव आघडीवर असून, आता धर्म अभ्यासक, महर्षि पंचायतन सिद्धपीठमचे पीठाधीश्वर अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री (Aniket Shastri) यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महंत अनिकेत शास्त्री भाजपकडून (BJP) निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून, राज्य तसेच केंद्रात आपल्या नवाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. वरिष्ठांच्या सांगण्यानुसारच येत्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी असल्याचा दावा अनिकेत शास्त्री यांनी केला आहे.(Mahayuti)

Mahayuti | रात्री शिंदे गटाच्या ‘हाय वोल्टेज’ बैठकीत काय घडलं..?

धार्मिकनगरी असल्याने धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती संसदेत जावी

आधीच उमेदवारी जाहीर झालेली नसतानाही हेमंत गोडसे यांनी त्यांचा आणि त्यांच्या सुनबाई भक्ती गोडसे यांचा उमेदवारी अर्ज घेतला असून, ते अर्ज घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला गेले होते. एवढंच नाहीतर, त्यांचा मतदार संघात प्रचारही सुरू आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख विलास शिंदे यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे.(Mahayuti)

मात्र, यातच आता अनिकेत शास्त्री हेदेखील निवडणुकीची तयारी करत असून, “नाशिक ही एक ‘धार्मिकनगरी’ आहे. येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा (Kumbh Mela) भरतो. यामुळे येथून एखादी धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती ही संसदेत जावी, या भावनेतून आणि मोदी गॅरंटी असल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Mahayuti)

Mahayuti Seat Sharing | गोडसेंना पुन्हा आश्वासन; रात्री ‘वर्षा’वर काय काय घडलं..?

आधीच नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे (Hemant Godse), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), अजय बोरस्ते (Ajay Boraste), माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate), प्रीतम मुंडे (pritam munde), शेफाली भुजबळ (shefali bhujbal), विजय करंजकर (vijay karanjkar) यांच्या नावाची चर्चा असताना आता थेट भाजपकडून अनिकेत शास्त्री यांनी उमेदवारीवर दावा केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता नाशिकची उमेदवारी कोणाला मिळणार..? याबाबत उत्सुकता शिगेला लागली असून, नाशिकच्या जागेकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. (Mahayuti)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here