Loksabha Election | देशात लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यातील मतदान पार पडले. मात्र, अजूनही महायुतीत काही जागांचे जागावाटप अजून रखडलेले आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर या जागांवर अद्यापही महायुतीने उमेदवार जाहीर केलेले नाही. अजूनही या जागांवरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
त्यामुळे महायुतीचे नेते, कार्यकर्ते आणि मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, आता समोर आलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तास हे महायुतीसाठी निर्णायक असणार आहे. कारण या 24 तासांत महायुतीचे अंतिम जागावाटप जाहीर होणार आहे.अधिक माहितीनुसार, ठाणे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिंदे गटाला मिळणार असून, पालघर व दक्षिण मुंबईचा तिढा अजून कायम आहे. पण या दोन्ही जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे.(Loksabha Election)
Loksabha Election | मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही – आमदार डॉ. राहुल आहेर
Loksabha Election | कोणत्या जागेवर कोणता उमेदवार..?
शिवसेनेच्या प्रतिष्ठेच्या ठाणे लोकसभा मतदार संघात एकनाथ शिंदे हे प्रताप सरनाईक यांना मैदानात उतरवणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु केली होती. यासाठी त्यांनी दाखल गुन्ह्यांच्या नोंदींचा तपशीलही पोलिसांकडून मागवला होता. तर, दक्षिण मुंबईतून लोकसभा मतदारसंघातून भाजप मंगलप्रभात लोढा यांना उमेदवारी देऊ शकते. तर, दुसरीकडे या मतदारसंघासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. राहुल नार्वेकर यांनी या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत हा मतदार संघ पिंजून काढला आहे.(Loksabha Election)
पण आता ऐनवेळी मंगलप्रभात लोढा यांचे नाव समोर आले आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून नर्तमे घडामोडी सुरू असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवार ठरलेला नसून, एथू रोज नवी नावे समोर येत आहेत. आधी विद्यमान खासदार हेमंत गोडसे नंतर अजय बोरस्ते यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, गेल्या काही तासांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नर विधानसभेचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे आता येत्या 24 तासांत नाशिक लोकसभेचे तिकीट कोणाला मिळेल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Loksabha Election)
Loksabha Election | ना गोडसे, ना भुजबळ; नव्या सर्वेक्षणात नव्या नावांची चर्चा
हेमंत गोडसे भवानी चरणी लीन
उमेदवारी जहर झालेली नसतानाही काल हेमंत गोडसे यांनी उमेदेवरी अर्ज घेतला होता. दरम्यान, उमेदवारी मिळावी यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबई आणि ठाणे वारी करणाऱ्या खासदार हेमंत गोडसे यांनी आता देवदर्शन सुरू केले आहे. आता हेमंत गोडसे यांनी तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीचे दर्शन घेतले. काल पहिल्याच दिवशी हेमंत गोडसेंनी उमेदवारी अर्ज घेतला असून, हा अर्ज त्यांनी देवीच्या पायावर ठेऊन आशीर्वाद घेतले. त्यामुळे आता 24 तासांत हेमंत गोडसेंचे भवितव्य ठरणार आहे. (Loksabha Election)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम