Nashik Lok Sabha | नाशिक लोकसभेत नवा ट्विस्ट; भुजबळांची तिरकी राजकीय चाल..?

0
26
Nashik Lok Sabha
Nashik Lok Sabha

Nashik Lok Sabha | एकीकडे महायुतीत नाशिक लोकसभेचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाहीतर, दुसरीकडे आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याचा मुहूर्तही ठरला आहे. काल सकाळीच प्रीताम मुंडेंचे नाव समोर आले तर, दुपारी भुजबळांच्या सूनबाई शेफाली भुजबळ यांचे नाव समोर आले होते यानंतर आता नाशिक लोकसभेसाठी महायुतीत सुरू असलेल्या या हायव्हॉल्टेज ड्रामामध्ये आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे.

आजपासून मुंबईत नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज घेता येणार आहे आणि अर्ज दाखलही करता येणार आहे. तर, या दोन्ही मतदार संघांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ही 3 मेपर्यंत असणार आहे.लोकसभा निवडणुक ही सात टप्प्यांत होणार असून, २० मे रोजी होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत नाशिक व दिंडोरी मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.(Nashik Lok Sabha)

Nashik Lok Sabha | मध्यरात्री मुख्यमंत्री, गोडसे अन् बोरस्तेंची गुप्त बैठक; आज सस्पेन्स संपणार..?

Nashik Lok Sabha | भुजबळांच्या कट्टर समर्थकाने घेतला अर्ज

एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवाराची प्रचाराची एक फेरीही पूर्ण झाली असून, त्यांचा अर्ज दाखल करण्याचा मुहूर्तही ठरला आहे. मात्र, महायुतीत या जागेवरील (Mahayuti) अजूनही तिढा कायम आहे. रोज नवीन नवे समोर येत आहेत. आधी हेमंत गोडसे आणि अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र भुजबळ यांनी जाहीर माघार घेतल्यानंतर नवीन सर्व्हे सुरू झाला आणि यात अजय बोरस्ते आणि राहुल ढीकले ही नवे समोर आली. (Nashik Lok Sabha)

दरम्यान, कालच प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभे करण्याच्या पंकजा मुंडे यांच्या व्यक्तव्यानंतर शेफाली भुबजबल यांचेही नाव समोर आले होते. मात्र, आता छगन भुजबळांचे निकटवर्तीय आणि विश्वासू असलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिलीप खैरे यांच्यासाठी त्यांचे भाऊ अंबादास खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. नाशिक लोकसभेचा महायुतीचा उमेदवार अजून निश्चित झालेला नसतानाच महायुतीतील नेत्यांकडून अर्ज घेण्यास सुरुवात झाल्यामुळे राष्ट्रवादीची किंवा भुजबळांची ही काही तिरकी चाल आहे का..? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. (Nashik Lok Sabha)

Nashik Lok Sabha | तिकीटाच्या शर्यतीतून भुजबळांची माघार; मोदी, शाहांचे मानले आभार

नाशिक, दिंडोरी लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना घोषणा – 26 एप्रिल
उमेदवारी अर्ज दाखल करणे – 26 एप्रिल ते 3 मे (सार्वजनिक सुट्टी वगळून)
दाखल अर्जाची छाणनी – 4 मे
अर्ज माघार घेणे –  6 मे रोजी (दुपारी 3 वाजे पर्यंत)
मतदान प्रक्रिया – 20 मे (सकाळी 7 ते सायंकाळी 5)
मतमोजणी – 4 जून (Nashik Lok Sabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here