Devendra Fadnavis | सध्या राज्यासह देशात लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असून, सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांचे युद्ध जुंपले आहे. यातच आता सत्ताधारी गोटातील एका नेत्याने शरद पवारांवर बोचणारी टिका केली आहे.
रयत क्रांती पक्षाचे प्रमुख सदाभाऊ खोत हे कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की,”महाराष्ट्रात गेल्या 70 वर्षांपासून काही मुठभर सरदारांचे राज्य होते. या मुठभर सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवण्याचे काम ही देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासारख्या माणसालाही त्याची जात काढावी लागली. देवेंद्र फडणवीस हा असा एकच बाप भेटला जो शरद पवारांनाही पुरुन उरला. त्यामुळे या वयातही शरद पवारांना आता खोटं बोलून रेटून चालावे लागत असल्याची दाहक टिका सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केली आहे. (Devendra Fadnavis)
Devendra Fadnavis | देवेंद्रजींनी श्रीरामांवर गाणं लिहिलं अन् त्यांच्या पत्नीने ते गायलं
या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी तळागाळातील प्रत्येक समाज उभा असेल. आम्ही लहान घटक पक्ष हे भाजपसोबत असून, ही निवडणूक भारत विरुद्ध इंडिया अशी असणार आहे. इंडिया आघाडीतील सर्व लुटारू आहेत. सगळे त्या अलीबाबाचे साथीदार असून, या निवडणुकीत इंडिया आघाडीला मुठमाती मिळणार आहे, असंही ते म्हणाले. (Devendra Fadnavis)
Devendra Fadnavis | महायुतीला मोठं यश मिळणार
पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा महायुतीला मोठे यश मिळेल, असं चित्र असून, पश्चिम महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराने मंतरलेला भाग आहे. आत्ताची लढाई ही वाडा विरुद्ध गावगाडा अशी असणार आहे. तर, या निवडणुकीत महायुती हे सगळे वाडे उध्वस्त करणार आहे. आणि रयतेचा विजय निश्चित होईल, असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. (Devendra Fadnavis)
Devendra Fadnavis | राहुल गांधींपासून पवारांपर्यंत सर्वांनाच घेरले; फडणवीस कडाडले
राजकारणात उन्हाळा-पावसाळा असतो
मी एक चळवळीतला कार्यकर्ता असून, आम्ही चळवळीतील सर्व चढ उतार पाहिलेले आहेत. मला कधीही मी आमदार, मंत्री होईल असं वाटलं नव्हतं. पण मी आमदारकीचे शिवार बघितले. मी मंत्रीपदाचे शिवार बघितले. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की, शेताभातातल्या शिवारात उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळाही असतो. तसंच राजकारणातल्या शिवारातही उन्हाळा, पावसाळा, आणि हिवाळा हा असतोच. मात्र, राजकारणात हिवाळा आला की लोक गारव्याला येतात. उन्हाळा आला की हे गडीलोक पळून जातात आणि पाऊसाळा आला की नाचतात. (Devendra Fadnavis)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम