Sanjay Raut | ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे आपल्या आक्रमक भाषाशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. ते रोज कोणावर तरी निशाणा साधत असतात. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि बोचऱ्या टीकांसाठी ते ओळखले जातात. तर, संजय राऊतांच्या टीकांना समोरूनही त्याच ताकदीचे उत्तर मिळते. असे रोज आरोप प्रत्यारोपांचे डाव रंगत असतात. यात आतापर्यंत अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर टिका करताना त्यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. मात्र, एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संजय राऊतांना मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठीचा फॉर्मच भरला आहे. (Sanjay Raut)
दरम्यान, राऊतांच्या टीकेला उत्तर देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चक्क संजय राऊत यांना मनोरुग्णालयात भरती करण्यासाठीचा फॉर्म भरला आहे. या व्हायरल होत असलेल्या मनोरुग्णालयाच्या एडमिशन फॉर्ममध्ये त्यांनी आपण खासदार तथा संपादक, सामना संजय राऊत यांचे हितचिंतक असल्याचे नमूद केले आहे. या कथित अर्जासोबत विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे, इलेक्ट्रॉनिक मीडियातील बातम्यांच्या सीडी व पेन ड्राईव्ह देखील दिल्या आहेत. (Sanjay Raut)
Sanjay Raut | वायफळ बडबड करण्यापेक्षा..; मालेगाव कोर्टाने राऊतांना झापले
Sanjay Raut | त्यांना मनोरुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे
दरम्यान, या फॉर्ममध्ये “संजय ऊर्फ मनोरुग्ण राऊत यांची काही दिवसापूर्वीची विधानं पाहता त्यांना मनोरुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे. कधी त्यांना पवार साहेब हे या देशाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात. तर, त्यांना कधी राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात. तर, कधी उद्धवजी पंतप्रधानपदाचे उमेदवार का असू नयेत? असंही ते म्हणतात. (Sanjay Raut)
यामुळे आम्ही मनसेच्या वतीने संजय राऊत यांचा पुणे येरवडा येथील मनोगरुग्णालयाचा एडमिशन फॉर्म भरला आहे.” असं या अर्जात गजनान काळे यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे “अॅडमिट व्हा. योग्य उपचार घेऊनच आणि पूर्ण बरे होऊनच तुम्ही परत या, काळजी घ्या.” असंही या अर्जात म्हटलं आहे. राज ठाकरे आणि मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर संजय राऊत यांनी सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. ते सतत मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका करत असल्याने आता मनसेनेही त्यांच्या विरोधात हत्यार उपसले आहे.
आतापर्यंत अनेक नेत्यांनी राऊत यांच्या टीकांना प्रत्युत्तर देताना, संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. मात्र, आता मनसेने थेट संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याचा फॉर्मच भरल्याने यामुळे एकच हशा उडाला आहे. (Sanjay Raut)
Sanjay Raut | आरोप करणे त्यांचा ‘धंदा’; संजय राऊतांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम