सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | ‘देवळा तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पञकार’ संघाच्या अध्यक्षपदी जेष्ठ पञकार सोमनाथ जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शुक्रवारी (दि. १५) रोजी बाजार समितीच्या मिटिंग हॉलमध्ये तालुका पञकार संघाचे तत्कालीन अध्यक्ष मोठाभाऊ पगार यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक बैठक घेण्यात आली. यावेळी संघाच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यात तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते जेष्ठ पत्रकार सोमनाथ जगताप यांची निवड करण्यात आली.(Nashik)
Nashik | आ. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते विकास कामांचा उद्घाटन सोहळा
कार्यकारणी पुढीलप्रमाणे –
उपाध्यक्ष – देविदास बोरसे
कार्याध्यक्ष – दिनेश सोनार
संपर्क प्रमुख – विनोद देवरे
सरचिटणीस – विश्र्वास पाटील
चिटणीस – महेश शिरोरे
खजिनदार – अनिल सावंत
संघटक – महेश सोनकुळे
जिल्हा कार्यकारणी सदस्य – पंडित पाठक,
जिल्हा सरचिटणीस – अविनाश महाजन व भिला आहेर(Nashik)
Deola | देवळा नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी १० कोटींचा निधी मंजूर
यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार नितीन शेवाळकर, प्रा. गोरख निकम, खंडू मोरे, शरद पवार, योगेश सोनवणे, दिनेश शेवाळे आदी संघाचे सदस्य उपस्थित होते. यात सर्व पत्रकारांना ओळखपत्र वाटप करण्यात येऊन, सन २०२४-२५ साठी नूतनीकरणाचे फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच उद्या शनिवारी (दि. १६) रोजी पुणे येथे होणाऱ्या संघाच्या अधिवेशना संदर्भात चर्चा करण्यात आली. पुढील काळात संघाच्या वतीने विविध कार्यक्रम, पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज केले जाईल असे नूतन अध्यक्ष जगताप यांनी सांगितले. नूतन कार्यकारिणीचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.(Nashik)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम