MLA Anil Babar | महाराष्ट्राचे ‘पाणीदार आमदार’ हरपले…

0
33
MLA Anil Babar
MLA Anil Babar

MLA Anil Babar |   शिवसेना एकनाथ शिंदे गटातील एक मोठा नेता आज हरपला आहे. वयाच्या ७४ व्या त्यांची प्राणज्योत मळवली आहे. खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. न्यूमोनियाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना काल दुपारी सांगली येथे रुग्णालयात दाखल केले होते. शिवसेनेत फुट पडल्यानंतर दिवंगत आमदार बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. अनिल बाबर हे शिंदेंचे विश्वासू आणि अत्यंत जवळचे होते. तसेच अनिल बाबर यांची ‘पाणीदार आमदार’ अशी ख्याती होती.

विरोधकांच्या महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत बाबर यांनी त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  खंबीर साथ दिली होती. ते सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदेंसोबतच होते. ठाकरे गटाकडून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या यादीत आमदार अनिल बाबर यांचाही समावेश होता. २०१९ च्या निवडणुकांमध्ये अनिल बाबर यांनी शिवसेनेच्या तिकीटावर उमेदवारी लढवली होती. यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता.(MLA Anil Babar)

Deola | गिरणा नदीवरील के.टी वेअरमुळे पाणी प्रश्न मार्गी लागणार – आ. राहुल आहेर

MLA Anil Babar | अशी आहे कारकीर्द… 

आमदार अनिल बाबर हे आतापर्यंत तब्बल चार वेळा आमदार झाले आहेत. १९९०, १९९९, २०१४, २०१९ असे लगातार चार वेळा ते निवडून आलेले आहेत. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अनिल बाबर यांनी वयाच्या १९ व्या वर्षीच राजकिय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला होता. खानापूर तालुक्यातील गर्दी या गावचे सरपंच म्हणून ते पहिल्यांदा निवडून आले होते. ‘टेंभू योजना’ पूर्णत्वाकडे नेण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते.

दरम्यान, गेल्या वर्षीच बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचेही निधन झाले होते. त्यातनंतर सहा महिन्यातच आता अनिल बाबर यांचेही निधन झाले आहे. एका वर्षात दोन सदस्यांच्या निधनामुळे बाबर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, आज आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे आज नियोजित मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खानापूर-आटपाटीला येथे जाणार आहेत.  (MLA Anil Babar)

Khichdi Scam | अन् संजय राऊतांनी आरोपींची नावंच वाचून दाखवली…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ट्वीट

सांगली जिल्हयातील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांचे आज आकस्मिक निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने शिवसेनेच्या परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली. खानापूर या तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच ते आता तब्बल चार वेळा आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास हा अतिशय प्रेरणादायी होता. रोखठोक भूमिका मांडण्यासाठी अनिल बाबर हे कायम ओळखले जायचे. आज त्यांच्या जाण्यामुळे खानापूर मतदारसंघासह राज्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगात संपूर्ण शिवसेना परिवार हा बाबर कुटुंबियांच्यासोबत आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती आणि शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे ट्वीट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.(MLA Anil Babar)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here