Gold Silver Rate Today | नव वर्षाच्या या पहिल्या महिन्यात सोने-चांदिने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. या महिन्यात किरकोळ वाढ वगळता सोन्याच्या दरांमध्ये लगातार घसरण सुरू ओटी. या महिन्याच्या ३ तारखेपासूनच सोन्याची किंमतीनची घसरगुंडी ही सुरूच आहे.
या संपूर्ण महिन्यात सोन्याचे दर हे २,२०० रुपयांनी खाली घसरले. तर, चांदीच्या दरांमध्येही ४,४०० रुपयांची घसरण झाली. काही दिवस दर वाढले असले तरीही त्यानंतर लगेच तितकेच दर पुन्हा खालीही आले. यामुळे सामान्य ग्राहकांची पाऊले सराफ बाजाराच्या दिशेने वळली. आता या आर्थिक वर्षाचे बजेट अगदी तोंडावर आले आहे. या बजेटनंतर सोने-चांदीच्या किंमती पुन्हा वर सरकण्याची शक्यता आहे. तर, असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर…(Gold Silver Rate Today)
Gold Silver Rate Today | सोने-चांदी झाले स्वस्त; असे आहेत आजचे दर
सोन्याच्या दरांत इतकी वाढ
नवीन वर्षाच्या या पहिल्याच महिन्यात सोन्याच्या किंमतींमध्ये सलग घसरणीचे सत्र सुरू होते. मार, या महिन्याच्या शेवटच्या दिवसांत सोन्यात दरवाढ सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात सोनेचे दर हे तब्बल २,२०० रुपयांनी खाली आले आहेत. या आठवड्यात सोन्याचे दर हे शंभर रुपयांनी वर सरकले. तर, गुडरिटर्न्सनुसार आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ५७,९५० रुपये असे आहेत. तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६३,२०० रुपये असे आहेत.
चांदीही महागली
जानेवारी महिन्यात सोन्याच्या पाठोपाठ चांदीनेही खरेदीदारांना मोठा दिलासा दिला. चांदीचे दर हे ४,४०० रुपयांनी खाली घसरले. मात्र, गेल्या आठवड्यात चांदीच्या दरांमध्ये तब्बल १,००० रुपयांची वाढ झाली. तर, २९ जानेवारी रोजी चांदीच्या दरांमध्ये २०० रुपयांची वाढ झाली. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज एक किलो चांदीचे दर हे ७६,२०० रुपये असे आहेत.(Gold Silver Rate Today)
Gold Silver Rate Today | राम मंदिराच्या सोहळ्यानंतर, असे आहेत सोने-चांदीचे दर
Gold Silver Rate Today | असे आहेत १४ ते २४ कॅरेटचे दर..?
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सोन्याचे दर खाली घसरले असून, चांदी महागली आहे. तर, प्रति कॅरेटप्रमाणे असे आहेत आजचे दर…
२४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने – ६२,५१५ रुपये,
२३ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने – ६२,२६५ रुपये,
२२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने – ५७,२६४ रुपये,
१८ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने – ४६,८८६ रुपये,
१४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने – ३६,५७१ रुपये असे आहेत.
तर, आज एक किलो चांदीचा भाव हा ७१,३७१ रुपये असा आहे.(Gold Silver Rate Today)
(टीप – वरील दर हे सूचक असून, त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक जवेलरसोबत संपर्क साधावा.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम