माधुरी रोहम
नाशिक प्रतिनिधी; शहरात हत्येचे सत्र सुरूच आहे. सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांचा आज, शुक्रवारी सकाळी खून करण्यात आला. युनियनच्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली असून अवघ्या आठवडाभरात हा तिसरा खून आहे.
सातपूर परिसरातील भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे हे शुक्रवारी सकाळी कामगार युनियनच्या कामासाठी सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपनीत गेले होते. गेल्या काही दिवसापासून या कंपनीत युनियन स्थापनेवरून दोन युनियनमध्ये वाद सुरू होता . इघे यांनी युनियन स्थापन करण्यास दुसऱ्या युनियनच्या प्रमुखासह काही कामगारांचा विरोध होता. यावर तोडगा काढण्यासाठी इघे आज सकाळी कंपनीत गेले होते. यावेळी वाद होऊन त्यांच्यावर सशस्त्र वार करण्यात आले. त्यात गंभीर जखमी झालेल्या ईघे यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम