Gold Silver Rate Today | राम मंदिराच्या सोहळ्यानंतर, असे आहेत सोने-चांदीचे दर

0
62
Gold Silver Price 29 May 2024
Gold Silver Price 29 May 2024

Gold Silver Rate Today |  इतक्या दिवसांच्या प्रतिक्षेनंतर या महिन्यात सोने चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. त्यामुळे सराफ बाजारात गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. या महिन्यात 3 जानेवारीपासूनच सोन्याच्या किंमतींमध्ये घसरणीचे सत्र सुरू आहे. गेल्या १५ दिवसांतच सोन्याचे दर हे तब्बल २,१५० रुपयांनी खाली आले आहेत. तर चांदीचे दर हे ४,४०० रुपयांची घसरण झाली आहे. काल अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या पर्श्वभूमीवर सराफ बाजार महासंघाने सुट्टी जाहीर केल्यामुळे भाव जाहीर झाले नाहीत. दरम्यान, या सोहळ्याचा आज सोने – चांदीच्या दरांमध्ये काय परिणाम झाला. हे जाणून घेऊयात. तर, असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर….(Gold Silver Rate Today)

असे आहेत सोन्याचे आजचे दर 

गेल्या वर्षात दिवाळीच्या काळात सोन्याच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला होता. गेल्या १५ दिवसांत झालेली किंचित दर वाढ वगळता, सोन्याच्या किंमतींचा आलेख हा लगातार खालीच सरकताना दिसत आहे.  या आता पर्यंतच्या घसरणीच्या काळात सोने हे तब्बल २,१५० रुपयांनी खाली आले. तर,काल भावात कुठलाही बदल आढळून आला नाही. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ५७,९५० रुपये असे आहेत. तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६३,२०० रुपये इतके आहेत.(Gold Silver Rate Today)

Gold Silver Rate Today | सोने-चांदी खरेदीसाठी आजचाच मुहूर्त गाठा; असे आहेत आजचे दर

चांदीत घसरण सत्र सुरूच

या महिन्यात चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. १० जानेवारी पासून ते १५ जानेवारी पर्यंतच्या काळात चांदी तब्बल १४०० रुपयांनी वर सरकली आहे. मात्र, तर त्याआधी चांदीच्या दरांमध्ये ३१०० रुपयांनी घसरण झाली होती. तर, १६ जानेवारी रोजी दरांमध्ये ३०० रुपयांची आणि १७ जानेवारी रोजी ६०० रुपयांनी तर, १८ जानेवारीला दर पुन्हा ४०० रुपयांनी खाली घसरले. १९ जानेवारी रोजी चांदीच्या दरांमध्ये २०० रुपयांची वाढ झाली. २० जानेवारीला देखील किंमतींमध्ये तितकीच घसरण झाली होती. दरम्यान, आज गुडरिटर्न्सनुसार एक किलो चांदीचे दर हे ७५,५०० रुपये असे आहेत.

Gold Silver Rate Today | सोने-चांदीची ‘गूड न्यूज’; असे आहेत आजचे दर

Gold Silver Rate Today | असे आहेत १४ ते २४ कॅरेटचे दर

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली असून, प्रति कॅरेटनुसार असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर…

२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६२,३९० रुपये,

२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६२,१४० रुपये,

२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ५७,१४९ रुपये

आणि १८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ४६,७९३ रुपये,

तर, १४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ३६,४९८ रुपये असे आहेत.

दरम्यान, एक किलो चांदीचा आजचा दर हा ७१,२२८ रुपये असा आहे. (Gold Silver Rate Today)

(वरील बाबी “द पॉइंट नाऊ’ फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही. तसेच वरील दर हे सूचक असून, यात करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.) 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here