Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल; कसा असेल नाशिक दौरा

0
32
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray | एकीकडे राम मंदिराचा दिमाखदार लोकार्पण सोहळा पार पडत असताना, दुसरीकडे उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. उद्या शिवसेना ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. उद्धव ठाकरे यांना अयोध्येच्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे ते नाशिकच्या राम भूमीत काळाराम मंदिरात पूजाविधी करून दर्शन घेणार आहेत.

दरम्यान, यावेळी नाशिकमधून ते आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फोडणार आहे. यासाठी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे नुकतेच ओझर विमानतळावर दाखल झाले आहेत. यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचे जंगी स्वागत केले. तसेच, उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत. (Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray | असा असेल उद्धव ठाकरेंचा ‘नाशिक दौरा’

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित न राहता आज उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आलेले असून, ते आज पंचवटीतील काळाराम मंदिरात संध्याकाळी श्रीरामाचे पूजन करणार आहेत. त्या नंतर ते रामकुंडावर गंगा पूजन आणि गोदा आरतीही करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची नाशिकच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि  ज्यांच्या खांद्यावर या कार्यक्रमाची धुरा आहेत असे, खासदार संजय राऊत यांनी जोरदार तयारी केलेली आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा याआधी पाहणी दौराही झाला होता.

Uddhav Thackeray | काळाराम मंदिराचे घेणार दर्शन

ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे नाशिक विमानतळाहून ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी भगुर येथे जाणार आहेत. त्यानंतर ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेणार आहेत त्यानंतर ते पूजविधी आणि महाआरती करतील. सायंकाळी साडेसहा वाजता ते गोदा आरती करणार आहेत. (Uddhav Thackeray)

Manoj Jarange | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनोज जरांगेंना आवाहन

नाशकात ठाकरेंची तोफ धडाडणार

उद्या नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती असून, त्यांना अभिवादन करून या अधिवेशनाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर याच दिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा ही नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरे हे या जाहीर सभेत कुणावर निशाणा साधणार हे पहावे लागणार आहे.

…म्हणून काळाराम मंदिरात येणार 

“देशातील वातावरण बदलण्यास सुरवात करण्यासाठी उद्या नाशिकमध्ये हे अधिवेशन घेणार आहे. जितके महत्त्व अयोध्येला आहे तितकेच नाशिकच्या पंचवटीलाही आहे. जर, अयोध्येत श्री राम राजा झाले तर येथे त्यांना त्याग, संघर्ष करावा लागला म्हणून आम्ही संघर्ष करणाऱ्या रामाच्या पंचवटीत जाऊन काळाराम मंदिराचे दर्शन घेणार आहोत, असे खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये पत्रकारांसोबत बोलताना म्हटले आहेत. (Uddhav Thackeray)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here