जिल्हा परिषद उपाध्यक्ष गायकवाड यांना भुजबळांनी फटकारले ; निधी वाटपाचे नियोजन करण्याचे दिले आदेश

0
24

द पॉईंटनाऊ प्रतिनिधी : नाशिक जिल्हा परिषद वार्षिक योजनेच्या निधी वाटपावरून चांगलाच गदारोळ निर्माण झाला होता. निधी वाटपाचे नियोजन अनेक दिवसांपासून रखडले आहे. त्यात विरोधी व सत्ताधारी सदस्यांमध्ये निधी वाटपावरून वाद सुरू होता, वाखारी गटाच्या सदस्या नूतन आहेर व जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्यात देखील चांगलीच शाब्दिक चकमक झाली होती. त्यासंदर्भात आज आहेर यांनी पालकमंत्री भुजबळ यांची भेट घेऊन तक्रार केली, यावर पालकमंत्र्यांनी गायकवाड यांची कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गायकवाड यांना भेटुन विरोधी पक्षाच्या सदस्यांना अधिक निधी का दिला जातो, निधी वाटपात भेदभाव का करताय असा जाब विचारत, माझ्या गटात अनेक विकास कामे खोळंबली असून त्यासाठी माझ्या गटास अधिक निधी मिळावा. ही मागणी केली असता, सदर मुद्द्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता.

आज या संदर्भात संतप्त झालेल्या नूतन आहेर यांनी पालक मंत्री भुजबळ यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली, असता भुजबळ यांनी भ्रमणध्वनी द्वारे उपाध्यक्षांची चांगलीच कान उघाडणी केल्याचे समजते, त्यात निधी वाटप करताना योग्य नियोजन करण्याचे कडक शब्दात आदेश दिले. शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, देवळा तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुनील आहेर, जि प सदस्य यशवंत शिरसाट, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे सदस्य उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here