Mumbai Police | सामान्य नागरिकांवर काही अत्याचार होत असल्यास, आपण पोलिसांकडे सुरक्षेसाठी जातो. पण आता या घटनेमुळे राज्यात पोलिसच सुरक्षित नसल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे. राज्याच्या पोलिस दलातील महिला पोलिस या सुरक्षित नसल्याची बाब समोर आली असून, या महिला पोलिसांवर अत्याचार करणारेही दुसरे तिसरे कोणी नसून वरिष्ठ पोलिस अधिकारीच आहेत. दरम्यान, ही संतापजनक बातमी मुंबई पोलिस दलातून समोर आली आहे. (Mumbai Police)
अधिक माहितीनुसार, मुंबई पोलिस दलातील एक दोन नव्हे तर, तब्बल आठ महिला पोलिसांकडून संबंधित तीन पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे यात पोलीस उपायुक्तांचाही सामावेश आहे. दरम्यान, या आठ पीडित महिला पोलिसांनी याप्रकरणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलेले आहे. याचमुळे आता आदर्श पोलिस दल असलेल्या मुंबई पोलिसांच्याच वर्दीला डाग लागला असून, आता राज्यात सामान्य महिलाच नाही तर महिला पोलीसही सुरक्षित नाही का ?, आता न्यायाची आणि सुरक्षेची अपेक्षा कोणाकडून करावी ?, महाराष्ट्राचा खरंच बिहार होतोय का ?. असे प्रश्न उपस्थित होत असून, याबाबत विविध स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. (Mumbai Police)
Rape Case | ‘ते’ फोटो व्हायरल केल्याची धमकी देत; कॅफेमध्येच मुलीवर अत्याचार
Mumbai Police | नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणी अधिक माहितीनुसार, मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा येथील ट्रान्सफर विभागात कार्यरत असलेल्या आठ महिला पोलिसांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलेले आहे. या पत्राद्वारे या महिलांनी एक पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरिक्षक तसेच आणखी एका पोलिस अधिकाऱ्यावर आरोप केलेले आहेत. “आम्ही तुम्हाला कमी काम देतो, असे कामाचे अमिष देत या पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित महिला पोलिसांचं शोषण केलं असल्याची गंभीर घटना समोर आली आहे. संबंधित महिला पोलिसांना अधिकाऱ्यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी नेत त्यांच्यावर बलात्कार केले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (Mumbai Police)
Rape Case | पोलिसच असं वागले तर…!, न्यायाची अपेक्षा कुणाकडून ठेवावी
संशयित ४ पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्यावर अत्याचार केले असून, मानसिकटसेच शारीरिक छल केलं असल्याचे पीडितांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही याबाबत पत्र लिहिलेले आहे. दरम्यान, आता या घटनेची वरिष्ठ तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी करण्याची व संबंधित अधिकाऱ्यांना कयथोत शिक्षा करण्याची मागणी केली आहे. यानुसार, पत्राची दखल घेत चौकशी सुरुदेखील करण्यात आलेली आहे.(Mumbai Police)
‘ते’ पत्र बनावट?
या प्रकरणी अपडेट आली असून, या प्रकरणी पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मुंबई पोलीस आयुक्तांना हे पत्र पाठवण्यात आले असून, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशीला सुरुवात केली असता, या महिला पोलीस शिपायांच्या नावाचा गैरवापर करून हे बनावट पत्र पाठवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, हे खरे असल्यास ते पत्र नेमकं कोणी पाठवलं आणि त्यामागे नेमका उद्देश काय याची चौकशी सूरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम