त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी : उद्यापासून श्रावण मासाला सुरवात होत आहे. उद्या पहिलाच श्रावण सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वर ज्योतिलिंग, येथे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. ब्रम्हगिरी परिक्रमा व कुशावर्त तिर्थ परिसरात भाविकांची गर्दी नेहमीच असते. मंदिर बंदच असले तरी भाविक येण्याकबी शक्यता लक्षात घेऊन रविवापासून मंगळवारपर्यंत त्र्यंबकेश्वर संचारबंदीचे आदेश काढण्यात आले आहे. यामुळे भाविकांनी त्र्यंबकेश्वर येथे जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राज्यात अद्याप सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. आता श्रावण महिन्यास उद्या 9 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. नाशिक जिल्ह्यात असलेलं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर या शिव मंदिरात श्रावण सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी होते. यामुळे त्र्यंबकेश्वर ज्योतिलिंग, ब्रम्हगिरी परिक्रमा व कुशावर्तासह परिसरातील इतर धार्मिक ठिकाणी सोमवारी भाविकांची गर्दी होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. यामुळे श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी त्र्यंबकेश्वर संचारबंदी राहणार आहे. रविवारी रात्री 8 वाजेपासून सुरु होणारी ही संचारबंदी मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे. या संदर्भात उपविभागीय दंडाधिकारी तेजस चव्हाण यांनी आदेश काढले आहे.
असे असतील आदेश……
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर, कुशावर्त तीर्थ परिसर, ब्रम्हगिरी परिक्रमा मार्ग व इतर अनुषंगिक धार्मिक स्थळे परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 (1) (3) अन्वये खालील नमूद कालावधीसाठी संचारबंदी लागु करण्यात येत आहे.
रविवार दि.08/08/2021 संध्याकाळी 8.00 वाजेपासून ते मंगळवार दि.10/08/2021 सकाळी 6.00 वाजेपर्यंत
रविवार दि.15 रोजी संध्याकाळी 8.00 वाजेपासून ते मंगळवार दि. 17 रोजी सकाळी 6.00 वाजेपर्यंत
रविवार दि.22 रोजी संध्याकाळी 8.00 वाजेपासून ते मंगळवार दि.24 रोजी सकाळी 6.00 वाजेपर्यंत
रविवार दि.29 रोजी संध्याकाळी 8.00 वाजेपासून ते मंगळवार दि. 31 रोजी सकाळी 6.00 वाजेपर्यंत
रविवार दि. 5 रोजी संध्याकाळी 8.00 वाजेपासून ते मंगळवार दि.9 रोजी सकाळी 6.00 वाजेपर्यंत.
असे असतील निर्बंध….
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर, कुशावर्त तीर्थ परिसर, ब्रम्हगिरी परिक्रमा मार्ग व इतर अनुषंगिक धार्मिक स्थळे याठिकाणी वरील नमूद तारखांना संचारबंदी लागू राहील.
त्र्यंबकेश्वर शहरात सदर कालावधीत बॅरिकेटींग करून वाहतूक नियंत्रण केले जाईल.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर, कुशावर्त तीर्थ परिसर व इतर अनुषंगिक धार्मिक स्थळे परिसर या ठिकाणी नित्यसेवेसाठी परवानगी असलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस मंदिरात अथवा परिसरात जाण्याची अनुमती असणार नाही. ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्ग सर्व भाविकांसाठी बंद राहील.
सदर कालावधीत नित्यसेवेसाठी अनुमती दिलेलेल्या, व्यक्तींना कोविड-19 बाबत केंद्र व राज्य शासन यांनी ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे मास्क वापरणे, sanitizer वापरणे, सामाजिक अंतर पाळणे व इतर आवश्यक
खाजगी लॉजिंग, हॉटेल व इतर ठिकाणी श्रावण यांत्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंच्या मुक्कामावर निर्बध असतील
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम