Big News | ठाकरे-शिंदे भेटीबाबत ‘या’ बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

0
35
Big News
Big News

Big News | आगामी निवणुकींच्या पार्श्वभुमीवर देशासह राज्यातील राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागल्याचं चित्र दिसून येत आहे. यातच राज्याच्या राजकारणात सध्या अनेक दावे-प्रतिदावे केले जात असून राजकीय पक्षांमधील आपापसांतील समिकरणं सध्या बदलण्याची चिन्ह स्पष्ट होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात असा धक्कादायक दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजण्याची शक्यता असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र सध्या राज्यात दिसत आहे. यातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना एक मोठा दावा केला असून फेब्रुवारीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन नेते एकत्र येऊ शकतात असा दावा करण्यात आला आहे.

Tea | नवऱ्याने गरम चहा मागितला आणि बायकोने त्याच्या डोळ्यातच कात्री खुपसली

Big News | संजय शिरसाट यांनीही आज या चर्चांना दिला दुजोरा

तसेच आजकाल आगामी निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर अनेक नेत्यांच्या गाठीभेटी होत असून कालच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट झाली. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटी सातत्याने होताना दिसत असून त्यामुळे हे दोन नेते आगामी निवडणुकीत एकत्र येऊ शकतात अशा चर्चा सुरू असतानाच नेते संजय शिरसाट यांनीही आज या चर्चांना दुजोरा दिला आहे.

तसेच ते बालताना म्हणाले की, राजकीय भेटी या जाहीरपणे घेतल्या जात नाहीत आणि राज ठाकरे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र आलेत तर हा महाराष्ट्राच्या राजकरणातील मोठा बॉम्बस्फोट असणार आहे. आताच्या घडीला हे दोन नेते एकत्र येण्याची कसलीही चिन्ह नसताना मनसे प्रमुख राज ठाकरे जर आमच्या सोबत आले तर यात काही गैर नसेल.

Supriya Sule | सुप्रिया सुळे ठरल्या देशाच्या राजकारणातील ‘कर्तृत्ववान महिला’

आगामी निवडणुकींच्या काळात महाराष्ट्रातील राजकारण चांगलच ढवळून निघणार अशी चिन्ह सध्या दिसत असताना नेत्यांमधील बंद दाराआड चालणाऱ्या चर्चेंत काय शिजतंय? आणि या भेटीगाठीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here