Nashik Corona | नाशिककरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोनाचे तीन शिकार

0
37
Nashik Corona
Nashik Corona

Nashik Corona | भारतात कोरोना पुन्हा एकदा आपला प्रसार वाढवत असताना कर्नाटकमधील  JN. 1 या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने तिघांचा बळी घेतला आहे. यातच आता JN. 1 या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात प्रसार वाढू लागलेला असून महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निष्पन्न झाला असला तरीही या महीलेची प्रकृती स्थिर आहे. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Crime News | माझ्याशी लग्न कर नाहीतर…; तरुणीसोबत केले धक्कादायक कृत्य

सिन्नर आणि दोडी येथून आणखी दोन रुग्ण

नाशिक जिल्ह्यात कोरोना पसरत असतानाच नाशिकमधील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यात तालुकानिहाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी स्क्रिनिंग सेंटर्स सुरू करण्यात आलेले आहेत. तसेच शहरातील सिन्नर आणि दोडी येथून दोन रुग्ण दाखल झाले असून या दोन रुग्णांची कोरोना रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाबाबत आणखी सतर्क राहण्याची गरज आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका महिलेला कोरोनाच्या ‘JN. 1’ संसर्गाची लागण झाल्याची माहिती मिळताच नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर रुग्णालयात या महिलेवर प्रसूतीपूर्व उपचार सुरू असताना प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने तीन दिवसांपूर्वी या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निष्पन्न झाला असून आता नाशिकमधील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

NAMCO Bank | नामकोत ‘प्रगती’ची जीप सुसाट; अपक्षांचे डिपॉझिटही जप्त

Nashik Corona | JN. 1 ची लक्षणे हे म्हणजे –

१. खवखवणारा घसा
२. सर्दी
३. वाहणारे नाक
४. खोकला
५. थकवा
६. डोकेदुखी
७. स्नायू दुखणे
८. ताप आणि सर्दी

वरील लक्षणे आपल्यास जाणवत असतील तर तातडीने जवळील रुग्णालयात संपर्क साधावा असं आवाहन नाशिकमधील आरोग्य यंत्रणेने केले आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here