Nashik News | नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना ५ वर्षांच्या कारावासाची तसेच १२.५० लाख रुपयांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. यातील आमदार केदार यांच्या सोबतच आणखी काही आरोपींनाही या प्रकरणात दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी ह्या बँकेत सन २००२ मध्ये तब्बल १५६ कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असताना त्यावेळी माजी मंत्री आणि आमदार सुनील केदार हे ह्या बँकेच्या अध्यक्षपदी होते. दरम्यान, ते ह्या प्रकरणी मुख्य आरोपी सिद्ध झाले आहेत.
Political News | महाविकास आघडीचं ठरलं ?; बघा कोणाला कीती जागा
माजी मंत्री आणि आमदार सुनील केदार हे नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी सिद्ध झाले असून त्यांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा कारावास आणि साडेबारा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली तसेच या निकालानंतर नाशिक जिल्हा बँकेतील ३४७ कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात अडकलेल्या माजी २९ संचालकांच्या अडचणी आता वाढू शकणार आहेत. यातच नाशिकच्या विद्यमान चार आमदारांसह एक खासदार आणि आठ माजी आमदारांचा यात समावेश असून त्यांच्यावरदेखील कारवाईची टांगती तलवार आहे. (Nashik News)
Nashik News | नाशिक जिल्हा बँक भ्रष्टाचार प्रकरण नेमकं काय?
नाशिक जिल्हा बँकेतील ३४७ कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईसाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती आणि ती संपुष्टात येत असून त्यामुळे नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निकालानंतर नाशिकमधील या 29 दिग्गजांचेही धाबे चांगलेच दणाणले आहेत. नाशिक जिल्हा बँकेला आर्थिक डबघाईस आणण्यासाठी संचालक मंडळ कारणीभूत असताना त्यातच जिल्हा बँकेत फर्निचर, नोकरभरती, सीसीटीव्ही आदी घोटाळ्यांत 29 आजी-माजी संचालकांनी बँकेचे आर्थिक नुकसान केले आहे. नाशिक जिल्हा बँकेतील ३४७ कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात या २९ माजी संचालकांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा बँकेने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईसाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत संपण्यास आता अवघा आठवडाच शिल्लक राहिला असताना त्यामुळे या 29 संचालक चांगलेच हादरले आहेत.
Crime Alert | धक्कादायक! तो न्यूड होताच तिने लगेच कॉल कट केला अन्…
चार विद्यमान, आठ माजी आमदारांचा समावेश
नाशिक जिल्हा बँकेतील २९ आजी-माजी संचालकांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश असून यात नाशिकमधील
विद्यमान आमदार-
- आमदार डॉ. राहुल आहेर,
- आ. नरेंद्र दराडे,
- आ. दिलीप बनकर,
- आ. माणिकराव कोकाटे या चार विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
माजी आमदार-खासदारांचा समावेश-
- जिवा गावित,
- माणिकराव बोरस्ते,
- डॉ. शोभा बच्छाव,
- शिरिष कोतवाल,
- वसंत गिते,
- प्रशांत हिरे,
- देवीदास पिंगळे,
- अद्वय हिरे या आठ माजी आमदार-खासदारांचा समावेश आहे.
अनेक राजकीय दिग्गजांच्या वाढणार अडचणी –
राघो अहिरे,
गणपतराव पाटील,
राजेंद्र डोखळे,
नानासाहेब भोसले,
राजेंद्र भोसले,
सुनील ढिकले,
वैशाली कदम,
धनंजय पवार,
अॅड. संदीप गुळवे,
परवेझ कोकणी,
डॉ. सुचेता बच्छाव,
अॅड. अनिल आहेर,
चंद्रकात लूमचंद गोगड,
दत्ता गायकवाड,
माणिकराव शिंदे,
नानासाहेब पाटील.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम