‘मरणे झाले स्वस्त, जगणे झाले महाग’ ; मध्यरात्री पुन्हा खून

0
41

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिक शहरात सध्या जीवन फारच हलकं फुलक झालंय अस वाटायला लागले कारण कुणाचे सत्र अजूनही सुरूच आहे, पंचवटी पोलीस ठाण्याच्या (Panchvati Police Station) हद्दीत पेठरोड वरील नाशिक आर टी ओ कार्यालया समोर बेरात्री बारा एक च्या सुमारास डोक्यात दगड घालून एका इसमाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे नाशिक पुन्हा हादरले आहे.

रात्री हत्या झालेल्या युवकाचे नाव राजेश शिंदे ( रा. भराडवाडी, फुलेंनगर) असे आहे. मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचे समजते. नेमके हत्येचे कारण मात्र अजून अस्पष्ट आहे.

सूत्रानीं दिलेल्या माहिती नुसार, मध्यरात्री १२ ते १२.३० वाजेच्या सुमारास मयत राजेश शिंदे दुचाकीवरून घरी जात असताना पेठरोड येथील आर टी ओ कार्यालया समोरील रस्त्यावर अज्ञात काही हल्लेखोरांनी राजेश शिंदे यास अडवून डोक्यावर दगडाने घाव घातला. व जागीच संपवलं

हल्ला इतका भयंकर होता की शिंदेचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

मृत्यू झालेला शिंदे नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. त्याची हत्या कोणी व का केली याबाबत पोलीस माहिती घेत असून रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हल्ले होऊन असेच खून होणार असतील तर ते मात्र धक्कादायक होत चालले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here