द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशकात (Nashik) सिंचन (Irrigation) भवन येथे मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी अचानक भेट दिल्याने, अधिकारी (Officers) वर्गाची चांलगीच धावपळ झाली.
राज्य मंत्री बच्चू कडू हे आपल्या कडक कार्य शैलीसाठी जाणले जातात.
ते नेहमीच राज्य (State) भरात कोणत्याही शासकीय कार्यालयास (Government Offices) अचानक भेट देतात. आणि कामांची झाडा झडती घेतात.
नाशिक येथे देखील राज्य मंत्री बच्चू कडू यांनी सिंचन भवनास अचानक भेट दिली. आणि अधिकारी – कर्मचाऱ्यांची कामाची झाडाझडती घेतली.
राज्य मंत्री आले मात्र बरेच शासकीय कर्मचारी कार्यालयात गैर हजर (Absent) होते. यामुळे मंत्री बच्चू कडू यांनी चांगलेच धारेवर धरले.
मंत्री बच्चू कडू हे नेहमीच वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांना अचानक भेट देत असतात.
त्यात कामात (Work) दिरंगाई करणारे अधिकारी – कर्मचारी आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश देखील देतात.
आता मंत्री बच्चू कडू यांच्या या भेटीत देखील, बरेचसे शासकीय कर्मचारी (Government Employee’s) गैर हजर (Absent) होते.
त्यामुळे ते आता या गैर हजर अधिकारी – कर्मचारी वर्गावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिलंय.
मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना शासकीय कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई झालेली बाब पटत नाही.
त्यामुळे ते नेहमीच शासकीय कार्यालयांना अचानक भेट देऊन, कामां बाबत झाडाझडती घेत असतात.
त्याच प्रकारे त्यांनी नाशिक मधल्या सिंचन (Irrigation) भवनास देखील अचानक भेट देत, कामांची माहिती जाणून घेतली. आणि त्यांच्या या भेटीत बरेचसे शासकीय अधिकारी – कर्मचारी गैर हजर दिसले.
त्यात त्यांनी कामां बाबत माहिती जाणून घेतली असता,बरीचशी शासकीय कामे प्रलंबित असल्याचे त्यांना दिसून आले.
कामे प्रलंबित न ठेवता, ते वेळेत पूर्ण करण्या बाबत मंत्री बच्चू कडू यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे त्यांना शासकीय कामात कोणताही उशीर झालेला आवडत नाही.
मात्र नाशिक इथल्या त्यांच्या या भेटीत, कामात असलेली दिरंगाई आणि अधिकारी वर्गांची गैर हजेरी या दोन्ही बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या आहेत.
मंत्री बच्चू कडू यांची कामाची पद्धत सर्वच प्रकारच्या शासकीय कर्मचाऱ्यांना अवगत आहे.
‘सरकारी काम अन सहा महिने थांब’ अशी म्हणच सामान्य नागरिकांनी केलेली आहे. मात्र मंत्री बच्चू कडू यांना शासकीय कामात उशीर आणि दिरंगाई खपत नाही.
मात्र त्यांना नाशिक सिंचन भवन भेटीत बरीच कामे प्रलंबित दिसली.
आता मंत्री बच्चू कडू यावर काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम