Crime news | अजूनही मुलींना ओझं मानणारे आणि मुलगा म्हणजे वंशाचा दिवा मानणारे लोक ह्या समाजात आहेत. सलग मुली झाल्या की, त्याचा दोष हा पत्नीवर टाकणे आणि तिचा छळ करणे ह्या घटना आजही आपल्या समाजात होत असतात. दरम्यान, अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पाठोपाठ आठही मुलीच झाल्यामुळे पती हा पत्नीचा छळ करत होता. त्यामुळे वैतागलेल्या पत्नीने क्रूर पतीला मारण्यासाठीचे अनेक प्रयत्न केलेत.
मात्र, ते सारे प्रयत्न फसल्याने, संतापलेल्या पत्नीने आपल्या पतीला मारण्यासाठी चक्क गुन्हेगारांना तब्बल दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानुसार, ह्या गुन्हेगारांनी तिच्या पतीवर हल्लादेखील केला. पण, तोदेखील प्लॅन फसला असून, पतीवर हल्ला केल्यानंतर पती मृत झाल्याचे समजून ते गुन्हेगार तिथून पळून गेले. दरम्यान, या प्रकरणी शिवम दुबे आणि अमन पुजारी अशी ह्या संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. तसेच, ह्यांना सुपारी देणाऱ्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत ह्या दांपत्याच्या मुलीने निगडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
Nashik Crime | नाशिकच्या माजी आमदाराला कट मारणे तिघांना भोवले
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, लग्नानंतर ह्या आरोपी महिलेला सलग आठही मुलीच झाल्यामुळे तिचा पती हा तिचा छळ करत होता तसेच, त्याने दुसरे लग्न करण्याचीही तयारी केली होती. त्यामुळे ह्या सर्व त्रासाला वैतागलेल्या पत्नीने रागाच्या भरात पतीचा काटा काढायचे ठरवले असून, दरम्यान, तिने याआधी आपल्या पतीवर विष प्रयोगही केला होता. पण तो फसल्यामुळे तिने शेजारीच राहणारा सराईत गुन्हेगार अमन पुजारी याला तिच्या पतीला मारण्याची दोन लाखांची सुपारी दिली होती.
दरम्यान, ह्या हत्येसाठी गुन्हेगार पुजारी याने त्याचा मित्र शिवम दुबे याला सोबत घेऊन, सुपारी मिळालेल्या पैशातून तलवारी विकत घेतल्या आण ७ डिसेंबर रोजी रात्री महिलेचा पती हा दारू पिऊन झोपलेला असताना, ह्या गुन्हेगारांनी त्याच्या घरात घुसून पतीवर तलावरीने सपासप वार केले. दरम्यान, पती मेल्याचे समजून ह्या गुन्हेगारांनी तिथून पळ काढला. पण, या घटनेत पती बचावला होता.
Nashik Fire Accident | निफाडमध्ये धावत्या शिवशाही बसला आग
ह्या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. दरम्यान, ह्या तपासात पोलिसांनी आरोपी अमन पुजारीला ओळखले आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने जखमी पतीच्या पत्नीनेच आम्हाला मारण्यासाठी सुपारी दिल्याचे त्याने चौकशी दरम्यान सांगितले. दरम्यान, पोलिसांनी आरोपी पत्नीलाही ताब्यात घेत तिची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम