Malegaon | आधी अद्वय हिरे यांच्या विरोधात नाशिक मध्यवर्ती बँक फसवणूक प्रकरणी तर, नंतर अपूर्व हिरे यांच्या विरोधात नोकरीचे आमिष देत एका तरुणाची तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी, आणि आता अपूर्व हिरे यांच्या पत्नी योगिता अपूर्व हिरे यांच्या विरोधात शासकीय पोषण आहार योजनेच्या अंतर्गत तांदळाची काळ्या बाजारात विक्री केल्या प्रकरणी, गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे हिरे कुटुंबियांचे एकामागोमाग एक काळे कारनामे हे उघड होत आहेत.
हिरे कुटुंबियांचे महात्मा गांधी विद्या मंदिर शैक्षणिक संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सरकारने दिलेल्या शालेय पोषण आहारासाठी दिलेल्या तांदळाची काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी जाणारा ट्रक हा दाभाडी येथील स्थानिक नागरिक तसेच शिवसेना शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांकडून ताब्यात घेत तो ट्रक छावणी पोलिस ठाण्यात सुपूर्द करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणी छावणी पोलिसांनी एका दहा चाकी ट्रकसह २२७ तांदळाच्या गोण्या ताब्यात घेतल्या आहेत. यासोबतच स्मिताताई हीरे महिला गृह उद्योग ह्या सहकारी संस्थेच्या तब्बल १४ संचालकांच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. यात अपूर्व हीरे यांच्या पत्नी योगिता अपूर्व हीरे यांचाही समावेश आहे.
Maharashtra | शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुखमंत्र्यांचे आश्वासन
काय आहे प्रकरण..?
दाभाडी शिवारातील स्मिताताई हीरे महिला गृह उद्योग सहकारी संस्थेच्या किचन शेडच्या गोदामातून काही गोण्या ह्या संशयास्पद रित्या ट्रक मध्ये भरल्या जात असल्याचा फोन सहाय्यक आयुक्त परखे यांना आला असता, ते तातडीने याठिकाणी दाखल झाले व त्यांनी ट्रक मधील तसेच गोदामामधील तांदळाची पाहणी केली. दरम्यान, तांदूळासह या गोदामात तांदळाच्या गोण्या, तेलाचे डब्बे आणि डाळीच्या गोण्या व इतर सामान आदळून आले.
हा सरकारच्या शालेय पोषण आहार ह्या योजनेच्या अंतर्गत देण्यात आलेला तांदूळ असल्याचे आढळले. ट्रक बाहेर पडत असताना, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या ट्रकची चौकशी केली असता, ह्या २२७ तांदळाच्या गोण्या ह्या काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशयाने नेण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आली. गांडावून मध्ये तांदुळाच्या गोण्या, तेलाचे डब्बे व डाळीच्या गोण्या व इतर शासकीय सामान हे दिसुन आले.
Malegaon | मालेगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन
दरम्यान, महापालिकेचे सहीयक आयुक्त अनिल परखे यांच्या तक्रारीवरून स्मिताताई हीरे महिला गृह उद्योग सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षा योगिता अपूर्व हीरे, अर्चना शिंदे, संचालिका ज्योति सोनवणे, सोनल मंडलेचा, उर्मिला खांडे, विद्या लगड, नीलिमा थेटे, सुरेखा बच्छाव, सोनल निकुंभ, पल्लवी पाटील, श्रद्धा जोगळेकर, स्मिता देशमाने, ज्योति शिंदे आदि १४ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम