Nashik | “राज्य स्वस्त धान्य दुकानदार” संघातर्फे राज्यातील स्वस्त धान्यांच्या दुकानदारांच्या काही प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात येत्या सोमवार (दि. ११) रोजी नागपूर विधानभवनावर मोर्चा हा काढण्यात येणार आहे.(Nashik)
या पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने म्हणजेच रेशन दुकाने ही रविवार (दि. १०) ते मंगळवार (दि. १२) या दरम्यान बंद राहतील. दरम्यान, या संदर्भातील निवेदन देखील सिन्नर तालुका धान्य दुकानदार संघटने कडून तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना देण्यात आले आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांना मिळणारे कमिशन हे अत्यंत कमी स्वरूपातील असून, त्यात वाढ करण्यात यावी. हे कमिशन प्रत्येक महिन्याला बँक खात्यावर जमा केले जावे. धान्य वितरणासाठी सरकारतर्फे पुरविले जाणारे पॉस मशीन हे जुने आणि खराब स्थितीत असल्यामुळे दुकानदारांसाठी तत्काळ फाईव-जी माशीनची सुविधा असलेली अद्ययावत यंत्रे देण्यात यावी.(Nashik)
Nashik Crime | वणी पोलिस ठाण्यात संशयिताची पोलिसाला धक्काबुक्की
ऑनलाइन स्वरूपात नागरिकांना धान्य वितरण करताना तांत्रिक प्रणालीत सर्वर डाऊन होण्याच्या अडचणी ह्या वारंवार येत असतात. त्यामुळे सामान्य जनतेच्या रोषास स्वस्त धान्य दुकानदारांनाच सामोरे जावे लागते. त्यामुळे तांत्रिक प्रणालीत देखील तातडीणे दुरुस्ती करण्यात यावी.(Nashik)
शासकीय गोदामातून धान्य हे मोजून दिले जात नाही. बारदान हे जुने असल्याने धान्याची काही वेळेस नासाडी देखील होते. दुकानदारांनी मागील चलनाने भरणा करून कार्डधारकांना मोफत धान्य वितरण केले आहेत, त्या वितरणाचे पैसे ही परत मिळावेत.
‘पीएम मोफत धान्य’ वाटपाचे कमिशन हे त्वरित मिळावे, या मागण्यांसाठी सोमवार रोजी राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांतर्फे नागपूर येथील विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यस्तरीय संघटनेच्या आवाहनानुसार या मोर्चा मध्ये सिन्नर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार हे सहभागी होणार आहेत. त्यामुळे रविवार ते मंगळवार या दरम्यान ही दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत.(Nashik)
Yellamma Devi | यल्लमा देवीच्या मंदिरात पादुकांसह लाखोंचे दागिने लंपास
या काळात सामान्य जनतेची मोठी गैरसोय होणार असल्याने, त्याबाबत धान्य दुकानदार संघटने कडून दिलगिरी व्यक्त करत संघटनेने तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना निवेदन दिलेले आहे.(Nashik)
यावेळी तालुकाध्यक्ष सतिश भुतडा, शहराध्यक्ष भगवान जाधव, चंद्रकांत माळी, कचेश्वर ढमाले, जगन्नाथ केदार, वसंत पवार, नवनाथ गडाख, दीपक जगताप, संजय भोत, महेंद्र कौठे, कल्पना रेवगडे, सुधाकर मुरकुटे, गोरख काळे, अण्णा जाधव यांच्यासह तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार हे यावेळी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम