Pune News | दिवसेंदिवस स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा अतिवापर हा प्रचंड वाढलाय. भारतात व्हॉट्सॲप हे तर लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलंय. पण, ह्या तंत्रज्ञानाचा वापर जसजसा वाढलाय, तसेच त्याचे तोटेही वाढु लागले आहेत. यामुळे लोकांची पेशन्स लेव्हल कमी होऊन त्यांच्यात इरिटेशन वाढलं आहे. (Pune News)
त्यामुळे रागाच्या भरात कोणीही सध्या काहीही करू लागलंय. याच रागाचा उद्रेक होऊन आता पुण्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आलेले आहे. पुणे (Pune News) जिल्ह्यातील एका कंपनीचा कर्मचारी आणि बॉस यांच्यातील एक विचित्र घटना समोर आली आहे.
बॉसने ह्या कर्मचाऱ्याला कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने संबंधित कर्मचारी हा दुखावला गेला होता. आणि त्याने रागाच्या भरात ऑफीसमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या समोरच बॉसला काठीने बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर, त्या संतप्त कर्मचाऱ्याने बॉसच्या कार्यालयाची तोडफोड करत बॉसचा आयफोनदेखील फोडला. ही संपूर्ण घटना पुण्यामधील (Pune News) चंदन नगर येथील मुंडवा रोड जवळील एका कंपनीत घडली आहे. (Pune News)
Nagpur | कॉँग्रेसचे ठिय्या आंदोलन; नानांना पोलिसांनी उचलून नेले
व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढल्याचा राग
अधिक माहितीनुसार, १ डिसेंबर रोजी हा सर्व प्रकार घडला असून, याप्रकरणी संबंधित कंपनी मालक अमोल शेषराव ढोबळे (वय ३१) यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. ते मूळचे लोहगाव येथील खांडवे नगरचे रहिवासी आहेत.
अमोल यांची इंस्टा गो प्राइवेट लिमिटेड ह्या नावाची कंपनी असून, त्यांच्या कंपनीत काम करणारा सत्यम शिंगवी ह्या कर्मचाऱ्याने रागाच्या भरात हल्ला केला व आपल्याला मारहाण केल्याचे मालक अमोल यांनी तक्रारीत नमूद केले आहे. बुधवारी त्यांनी चंदन नगर येथील पोलिस स्टेशन गाठून हा सर्व प्रकार कथन करत सत्यम शिंगवी याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. (Pune News)
नेमकं प्रकरण काय ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सत्यम हा ‘इंस्टा गो प्राइवेट लिमिटेड’ या कंपनीत काम करतो. पण, ह्या कंपनीतील कर्मचाऱ्यांशी त्याची वागणूक ही योग्य नव्हती. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी त्याच्या विरोधात मालक अमोल यांच्याकडे तक्रार केलेली होती. त्याच्या गैरवर्तनावर अनेकदा प्रश्न उपस्थित झाला होता. (Pune News)
यासंदर्भात बोलण्यासाठी व स्पष्टीकरण मागण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनातर्फे सत्यमला अनेकदा फोन करण्याचा, तसेच त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्याने काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे अखेर मालक अमोल ढोबळे याने सत्यमला कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकले.
Viral news | बटाट्याच्या नादात स्वतःचेच लग्नच विसरला नवरदेव
यामुळे सत्यम हा अत्यंत संतापला व त्याने त्याच रागाच्या भरात ऑफीसमध्ये येत आपल्याला व्हॉट्सअॅप ग्रुपमधून का काढलं, याचा जाब मालकाला विचारला. त्यानंतर रागाच्या भरात त्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या समोरच मालक अमोल ह्याला मारहाण करायला सुरूवात केली. थेट बांबूने त्याने अमोलला मारहाण केली.
एवढंच नाहीतर, त्याने ऑफीस मधील काही सामानाचीही तोडफोड केली व मालक अमोल यांचा महागडा आयफोनचा तोडत त्याचा चक्काचूर केला. या सगळ्या प्रकारानंतर मालकाने थेट पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सिंघवी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात चंदन नगर पोलिस हे पुढील तपास करित आहेत. (Pune News)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम