Jalgaon | जळगावच्या शिव महापुराण कथेत महिला चोरांचा सुळसुळाट

0
35

Jalgaon |  जळगावमध्ये (Jalgaon) चोरांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. जळगावात पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवपुराण कथा ऐकण्यासाठी काल शिवभक्तांचा मोठा जनसमुदाय उसळला होता. दरम्यान, ह्या गर्दीचा फायदा घेत काही चोरांनी हात साफ केले. दरम्यान, कथा संपल्यानंतर भाविकांना हे कळले आणि त्यानंतर संबंधित भाविकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ह्या चोरांना ताब्यात घेतलेलं असून, दोन डझन चोरांची टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे.

 जळगावात (Jalgaon) कथा ऐकण्यासाठी आलेल्या शिवभक्तांना चोरट्यांनी लुटल्याची घटना उघडकीस आली. कथा ऐकण्यात रममाण असणाऱ्या ह्या भाविकांचं कुणाचं पाकीट मारलं तर, कुणाची सोन्याची साखळी लंपास करण्यात आली आहे. आपले पैसेव दागिने चोरीला गेल्याचं लक्षात आल्यानंतर ह्या भाविकांनी पोलीस ठाणे गाठले. मोठ्या प्रमाणावर भाविक हे पोलीस ठाण्यात आल्याने पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत तब्बल २७ जणांना ताब्यात घेतलेलं आहे. ही मोठी टोळी असल्याचं सांगण्यात येत आहे.

जळगाव (Jalgaon) मध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन केलेलं असून, या कथेच्या कार्यक्रमात पहिल्याच  दिवशी भाविकांचा मोठा जनसमुदाय उसळला होता. ह्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलांचे दागिने, पैशांची पाकीटं व मौल्यवान वस्तू चोरी केले आहेत.

Winter Session | हिवाळी अधिवेशनावर धडकणार १०० मोर्चे; सरकारला घाम फुटणार?

पोलीसांचे भाविकांना आवाहन

या कारवाईत एका पुरुषाला आणि तब्बल २७ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ह्या गर्दीचा फायदा घेत या सर्व चोरट्यांनी महिलांचे दागिने व पुरुषांचे पाकीट चोरलेत. दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कार्यक्रम स्थळावरून एकेक करत २७ ते २८ संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे. या प्रकरणी, पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. या कथेसाठी येणाऱ्या भाविकांनी कुठल्याही मौल्यवान वस्तू व दागिने अंगावर घालून येऊ नये, असं आवाहन जळगावचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी केलेलं आहे.

मंत्री बसले जमिनीवर

जळगाव (Jalgaon) मधील वडनगरी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढील सात दिवस हा कार्यक्रम येथे पार पडणार आहे. या कथेच्या पहिल्याच दिवशी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा याठिकाणी उपस्थिती लावली होती.

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील पंडित प्रदीप मिश्रा यांचे दर्शन घेत जमिनीवर बसून संपूर्ण शिवपुराण कथा ऐकली. जमिनीवर बसून कथा ऐकणाऱ्यांमध्ये गुलाबराव पाटील यांना बघून अनेकजणांना आश्चर्याचा धक्का बसला.

Breaking News | भाजपा खासदारांचे तडकाफडकी राजीनामे


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here