Crime news | पुणे (pune) हे शिक्षणाचे माहेर घर आहे की, गुन्ह्यांची नगरी असा प्रश्न अलीकडे सर्वांनाच पडत आहे. दरम्यान, अशीच एक फसवणुकीची घटना ही उघडकीस आलेली आहे. पैशांचा पाऊस पाडतो असे सांगत पुण्यातील हडपसर येथील एका तरूणाचे भोंदू बाबाने तब्बल अठरा लाख रुपये लंपास केल्याचा प्रकार घडला आहे.(Crime news)
पुण्यातील (pune) हडपसर ह्या परिसरात असलेल्या ससाणे नगर येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच लाख रुपये बदलून कोट्यावधी रुपयांच्या पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगत एका तरुणाला १८ लाख रुपयांना या भोंदू बाबाने गंडा घातला आहे. या प्रकरणी संबंधित चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मांत्रिक आईरा शॉब याने माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून मी पैशाचा पाऊस पडतो असं आमिष दाखवत अनेकांना आतापर्यंत गंडा घालत होता. ह्या मांत्रिकांची व फिर्यादी छोटेलाल परदेशी याची एका मित्रामार्फत ओळख झाली. त्याने पैशाचा पाऊस पाडतो असे सांगत फिर्यादी यांना एक अघोरी पूजा मांडावयास सांगितली.
Nashik News | नाशकात कठोर कारवाईस सुरवात; प्रशासन ऍक्शन मोडवर
दरम्यान, ही पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही तोतया पोलिस आलेत. त्यांनी ह्या बाबासाह तरुणाला मारहाण करत या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले १८ लाख रुपये घेतले व ते पसार झालेत. हा सगळा डाव हा ह्या भोंदू बाबाने रचलेला आहे. हे कळताच फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी, भोंदू बाबा आईरा शॉब यांच्यासह माधुरी मोरे, रॉकी वैद्य व किशोर पंडागळे ह्या चार जणांवर हडपसर (pune) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.(Crime news)
भोंदू बाबाला बळी पडू नका
अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे अशा अनिष्ट प्रथांना बळी पडू नये यासाठी अनेक वर्षे आवाहन करत आहेत. पण, तरीही पैशाच्या लोभापायी अनेक शिकलेले लोकही अशा प्रकारच्या खोट्या आणि अनिष्ट प्रथांना बळी पडत असल्याचं ह्या घटनेवरून स्पष्ट होते. ह्या सगळ्या कारवाईनंतर अशा भोंदू बाबांच्या आमिषाला बळी पडू नका. बळी पडले असाल तर याची पोलिसांकडे तक्रार करा असं आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.(pune)
झटपट पैसे मिळवण्याचा लोभ निरनिराळ्या ठिकाणी अशा प्रकारचे भोंदूगिरीने लुबाडणारे बाबा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अशा मांत्रिकांच्या फसवणुकीला आणि आमिषाला बळी पडू नका, असे आवाहनही यावेळी प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.(Crime news)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम