Crime News | अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला वारंवार अत्याचार

0
25
Rape Case
Rape Case

Crime News |  जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार उघडकीस आलेला असून, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी शेतात नेऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. (rape) छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एका गावातील ही घटना असून, या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

तर, ह्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज पैठण येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. संजय मच्छिद्र मोहिते व विलास विनायक मुळे असे ह्या आरोपींची नावं आहेत. (rape)

याप्रकरणी संबंधित पिडीत अल्पवयीन मुलीने पैठण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ती नववीत शिक्षण घेते आहे. गावातील संजय मच्छिंद्र मोहिते आणि विलास विनायक मुळे हे ह्या पिडीत मुलीच्या घराच्या पाठीमागे राहतात. तर, गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही पिडीत मुलीच्या घरासमोरून जातांना तिच्याकडे सारखे बघून हसायचे.(Crime News)

political news | मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामोर्तब केला – डॉ. भारती पवार

दरम्यान, दिवाळीच्या आधी एके दिवशी दुपारच्या सुमारास संजु मोहिते हा ह्या पीडित मुलीच्या घराच्या पाठीमागे आला. आणि त्याने पीडित मुलीला पत्र्याच्या झोपडीमध्ये नेले आणि त्यानंतर त्याने संधी साधत तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केले. तसेच, या घटनेबाबत कोणालाही काही सांगितल्यास त्यांनी जीवे मारण्याची धमकीदेखील दिली होती. त्यामुळे मुलीने याबाबत कोणालाही सांगितले नाही.(Crime News)

पुन्हा अत्याचार…

दरम्यान, ह्या शनिवारी २ डिसेंबर रोजी विलास मुळे हा मुलीच्या घरी कोणीही नसतांना पुन्हा तिथे आला. तसेच, आपल्याला संजयच्या शेतातुन मोसंबी आणायला जायचे आहे असे सांगत तो मुलीला घेऊन शेतात गेला. यावेळी संबंधित शेतातील झोपडीजवळ संजय मोहिते हा देखील उपस्थित होता.

यावेळी आरोपी विलास मुळे ह्याने मुलीवर पुन्हा बलात्कार केला. दरम्यान, याचवेळी ही पीडित मुलगी घरी जात असतानाच तिचा भाऊ तिथे आल्याने त्याने आपल्या तिला कुठे चाललीस याबाबत विचारणा केली असता, तिने घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती भावाला दिली. त्यानंतर ह्या पीडित मुलीच्या तक्रारीवरून पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.(Crime News)

The Point Special | तीन राज्यात कमळ फुललं; भाजपच्या उत्तरेतील विजयाचा नेमका अर्थ काय?

तहसील कार्यालयावर आज मोर्चा…

दरम्यान, या घटनेनंतर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज पैठण येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ह्या मोर्चात पुढील मागण्या करण्यात येणार आहे.(rape)

अशा आहेत मागण्या

१. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे.

२. पिडीत मुलीला राज्य शासनाकडुन अर्थसहाय्य ५० लाख रुपये द्यावे.

३. संबंधित पिडीत मुलीला शासकीय नोकरी द्यावी.

४. दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी.

५. अॅट्रासिटी कायद्याची अंमलबजावणी करावी.

६. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या प्रवृत्तीवर कार्यवाही करावी.

७. पिडीत मुलीला आणि कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे.

Job Alert | ’10’ वी पास उमेदवारांनाही भारतीय नौदलात नोकरीची संधी!


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here