political news | मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामोर्तब केला – डॉ. भारती पवार

0
3

political news |  चार राज्यांतील निवडणुकांच्या रणसंग्रामात तीन राज्ये खिशात घालत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. हिंदी बेल्टमधील ह्या तीनही राज्यांमध्ये भाजपने मोठा विजय प्राप्त करून लोकसभेसाठी आपण पूर्ण ताकतीने तयार असल्याचा विश्वास दिला आहे. दरम्यान, ह्या निकालांचा परिणाम हा महाराष्ट्रावरही होणार असून, राज्यातही भाजपच सत्तेवर येईल असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे.(political news)

दरम्यान, ह्या चार राज्यांतील  निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर “पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा देशाच्या जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे.” अशी भावना यावेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
मागच्या निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तिन्ही राज्यांत काँग्रेसची सत्ता आलेली होती. परंतु आता ह्या तिन्ही राज्यांमध्ये भाजपकडे प्रचंड बहुमताने एकहाती सत्ता आलेली आहे.(political news)

The Point Special | तीन राज्यात कमळ फुललं; भाजपच्या उत्तरेतील विजयाचा नेमका अर्थ काय?

या राज्यांमधील जनतेचे व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार आणि अभिननंदन. केंद्रात सत्तेवर आल्यापासून पंतप्रधान मोदीजी यांनी गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, आदिवासी, युवा, महीला तसेच कामगारांसह सर्व जाती-धर्मांच्या लोकांसाठी वेगवेगळ्या जनकल्याणकारी योजना राबविल्या आहेत.(political news)

त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर कितीही आणि काहीही आरोप केलेत. तरी सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आणि विश्वास आहे. या निकालातूनही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा जनतेने शिक्कामोर्तब केलेला असून, पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानांना जनतेने पाठिंबा दर्शविला आहे.

पंतप्रधानांवर जेवढे आरोप केलेत. त्याला जनतेने निकालातून उत्तर दिलेले आहे. तर, येत्या चार, पाच महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने भाजपचेच सरकार येईल असा विश्वासही यावेळी डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केला.(political news)

Job Alert | ’10’ वी पास उमेदवारांनाही भारतीय नौदलात नोकरीची संधी!


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here