political News | महाराष्ट्र केसरी सारखे अनेक कुस्तीचे मैदानं गाजवणारे ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी आता लोकसभेचे मैदान मारण्याची तयारी दर्शविली आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरी तसेच महाराष्ट्राच्या पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत असलेले ACP विजय चौधरी यांनी आता लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.
तसेच, ते भारतीय जनता पक्ष या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान, माझी पहिली पसंती ही भाजपलाच असेल, असंही यावेळी ACP विजय चौधरी हे म्हणालेत. सोबतच आम्ही फक्त इच्छा व्यक्त करत असून, अजून कोणत्याही पक्षाशी माझं बोलणं झालेलं नाही, असंही यावेळी विजय चौधरी हे म्हणाले. दरम्यान, ट्रिपल महाराष्ट्र केसरी ACP विजय चौधरी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता राज्यातील राजकीय वर्तुळात ह्या चर्चांना उधाण आलं आहे.
ट्रिपल महाराष्ट्र केसरी तसेच अँटी करपशन विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली आहे. अजून कोणत्याही पक्षाशी बोलणं झालेलं नसून, आपली पहिली पसंती ही भाजपाला असणार आहे, असंही विजय चौधरी हे यावेळी म्हणाले. तसेच, कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत विचारले असता, जळगाव लोकसभा मतदार संघातून लढवण्याची आपली इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी जर वेळ आली तर, आपण नोकरीदेखील सोडणार असल्याचेही विजय चौधरी म्हटले आहेत.
Onion News | कांदा पिकावर ‘या’ रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता; शेतकरी चिंतेत
कोण आहेत विजय चौधरी ?
चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बगळी या गावचे सुपुत्र असलेले विजय चौधरी हे महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर सध्या कार्यरत आहेत. या शिवाय ते सलग तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी चॅम्पियन’ तसेच इतर अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेते राहिलेले आहेत. तसेच, विजय चौधरी यांनी राष्ट्रीय सुवर्णपदकावरदेखील आपले नाव कोरलं आहे.
ACP विजय चौधरी हे भारतीय कुस्तीपटू आहेत. तसेच तीन वेळा राज्यातील सर्वात प्रतिष्ठित असा कुस्ती सामना महाराष्ट्र केसरीचेही ते मानकरी राहिलेले आहेत. त्यांनी २०१४, २०१५ तसेच २०१६ या वर्षांमध्ये सलग तीन वेळा त्यांनी हा महाराष्ट्र केसरी पुरस्कार जिंकलेला आहे. ही कामगिरी करणारे नरसिंह यादव यांच्यानंतर विजय चौधरी हे राज्यातील दुसरे कुस्तीपटू ठरले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम