Satara | सातारा येथील गोडोलीमधील राजेवाडीतील विजय खामकर हे रिक्षा चालक आहेत. खामकर यांनी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा रिक्षा चालवून केला. त्यांची लेक सायली खामकर हिचा विवाह हा सांगवड (ता. पाटण) येथील शुभम पाटील यांच्याशी झाला आहे. पण, हा विवाहसोहळा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला. कारण ह्या लग्नासाठी जमलेले वऱ्हाडी हे चक्क रिक्षामधून विवाहस्थळी दाखल झाले होते.
रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या वडिलांच्या कष्टाला त्यांच्या सायली खामकर ह्या लेकीने अनोख्या पद्धतीने सलाम केला आहे. सायलीने तिच्या लग्नाचं वऱ्हाड हे चक्क रिक्षामधून नेण्यासाठी हट्ट धरला होता. वडिलांनीही लेकीचा हट्ट पूर्ण करण्याचा संकल्प केला व तो पारही पाडला.
यासाठी त्यांना देगाव येथील पाटेश्वर येथील रिक्षा संघटनेची मदत झाली. ह्या संघटनेतील रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा ह्या लग्नानिमित्त सजवून वऱ्हाडी मंडळींच्या प्रवासासाठी सज्ज ठेवल्या होत्या. राजेवाडी ते सातारा येथील मंगल कार्यालयापर्यंत लग्नासाठी वऱ्हाडी मंडळी ही रिक्षातून दाखल झाली.
Nashik | मनमाड रेल्वे स्टेशन महामार्गावरील ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला
राजेवाडीतील बहूतेक जण हे रिक्षा चालवण्याचाच व्यवसाय करतात. विजय खामकर यांची कन्या सायलीने रिक्षा व्यवसायातून कुटुंबाला स्थैर्य व सुबत्ता लाभली. या भावनेतूनच वऱ्हाडी मंडळी ही रिक्षातून आणण्याचा आग्रह धरला होता. यातून तिने वडिलांच्या कष्टाला अनोख्या पद्धतीने सलाम केला आहे. सायलीच्या लग्नासाठी १५ ते २० रिक्षांमधून हे लग्नाचे वऱ्हाड हे साताऱ्यातील मंगल कार्यालयात दाखल होताना बघायला मिळाले.
सजवलेल्या रिक्षा पाहून सातारकर अचंबित
इतक्या मोठ्या संख्येने साताऱ्यात सजविलेल्या रिक्षांचा ताफा बघून ये- जा करणारेही अचंबित झालेत. यामागची पार्श्वभूमी समजताच साऱ्यांनीच सायलीचे, आणि तिच्या वडिलांचे कौतुकही केले. या निमित्त कुटुंबीय, नातेवाईक यांच्या दृष्टीनेही हा विवाह सोहळा अनोखा ठरला आहे. सायली खामकरचे शिक्षण हे पदवीपर्यंत झालेले आहे.
आपण दुसऱ्या गाडीने न जाता स्वतःच्याच वडिलांच्या रिक्षामधूनच जावं असा तिचा हट्ट होता. हा क्षण सर्वांसाठीच आनंदाचा क्षण होता. सायलीचे वडील विजय खामकर हे म्हणाले की, “मुलांना आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असणे, यातच त्यांच्या कष्टाचे चीज दडलेलं असतं. सायली हीचं शिक्षण हे पदवीपर्यंत झालेलं आहे. आम्हाला तिचा सार्थ अभिमान वाटतो”, असंही ते यावेळी म्हणाले.
Milk protest | दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अभिनेते मकरंद अनासपुरे मैदानात
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम