Gold Silver rate | सोन्याने मोडला रेकॉर्ड; असे आहेत आजचे दर..?

0
13
Gold Silver price
Gold Silver price

Gold Silver rate |   २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ही आज ६२,६४० रुपये अशी असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत ६१,९५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झालेली होती. बुलियन मार्केटनुसार, चांदी ही ७५,५९० रुपये प्रति किलो ह्या दराने विकली जात आहे तर, मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ही ७५,१८० रुपये प्रतिकिलो अशी होती. ४ मे २०२३ रोजी २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ही ६१,६४६ रुपये अशी होती. दरम्यान, हा रेकॉर्ड सोन्याने आज मोडला आहे.

गुडरिटर्न्सनुसार, अशी आहे किंमत

सोन्यात मोठी दरवाढ झाली आहे. आतापर्यंत सोन्याच्या किंमतीने १५०० रुपयांची उसळी घेतली आहे. सोमवार (दि. २७) रोजी सोने २५० रुपयांनी महागले होते. २८ नोव्हेंबर रोजीचा भाव हा अपडेट झाला नाही आणि आता २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोनीचे दर हे ५७,५०० रुपये असे असून, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६२,६४० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी आहे.

Horoscope Today 29 nov: या राशीसाठी आजचा दिवस निर्णायक; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

चांदीतही इतक्या रुपयांची वाढ

१३ नोव्हेंबरपासून आजपर्यंत चांदीच्या दरांत ६,६०० रुपयांनी दरवाढ झाली आहे. मागील आठवड्यात १,४०० रुपयांनी किंमती ह्या वधारल्या होत्या. २७ नोव्हेंबर रोजी किंमती १००० रुपयांनी वाढल्या होत्या. आज एक किलो चांदीचा भाव हा ७५,५९० रुपये अशी आहे.

असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव..? 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ६२,६४० रुपये असे आहेत तर, २३ कॅरेट ६१,६६५ रुपये इतके आहे. २२ कॅरेट सोने हे ५६,७१२ रुपये असे आहे. १८ कॅरेट ४६,४३५ रुपये असून, १४ कॅरेट सोन्याचे दर हे ३६,२१९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहे. एक किलो चांदीचा भाव हा ७५,५९० रुपये झाला आहे.

(वरील सोन्याचे दर हे सूचक आहेत तसेच त्यात जीएसटी, टीसीएस व इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.)

Deola | नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश; नुकसानग्रस्त पिकांची आ. राहुल आहेर यांनी केली पाहणी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here