Government Job | सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी मोठी बातमी समोर आलेली आहे. विशेष म्हणजे तुम्हाला थेट शिक्षण मंत्रालयात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जवळच आली आहे.
Weather Update | अवकाळीचं संकट कधी होणार दूर? हवामान खात्याची पावसासंदर्भात मोठी अपडेट समोर
जाणून घ्या अधिक माहिती-
थेट शिक्षण मंत्रालयात नोकरी करण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील भरती प्रक्रिया देखील सुरू आहे. आता अजिबात उशीर करू नका आणि करा थेट अर्ज. शिक्षण मंत्रालयाने या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. शिक्षण मंत्रालयात त्यानुसार तब्बल 39 पदे भरली जाणार आहेत. ही भरती विविध पदांसाठी होणार असल्याची माहिती आहे.
या भरती प्रक्रियेत सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार या पदांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे उमेदवारांनी हे लक्षात ठेवा की, 28 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे आज तुम्ही अर्ज करू शकता. 28 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
या भरती प्रक्रियेत एसएसए प्रकल्पासाठी 26 सल्लागार, 7 वरिष्ठ सल्लागार, 4 मुख्य सल्लागार, 2 मुख्य सल्लागारांच्या पदांचा समावेश असणार आहे. यानुसार ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात ठेवा की, ही संपूर्ण भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीनेच होणार आहे. या पदांचा करारा कालावधी दोन वर्षांचा असणार आहे.
दोन वर्षांनंतर पुढील निर्णयानंतर हा कालावधी पाच वर्षांचा देखील होऊ शकतो. मात्र, हे सर्वकाही दोन वर्षांनंतर स्पष्ट होऊ शकतं. या पदांसाठी अर्ज करताना काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची म्हणजे सल्लागार पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे संबंधित विषयात मास्टर्स असणे आवश्यक आहे, त्याशिवाय ही निवड केली जाणार नाही.
फक्त मास्टर्सच नाही तर उमेदवाराला यासोबतच या कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे देखील आवश्यक असणार आहे. वरिष्ठ सल्लागाराच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे देखील पाच वर्षांचा अनुभव असायला हवा. जर तुम्ही मुख्य सल्लागार पदांसाठी अर्ज करत असाल तर लक्षात ठेवा की, या पदासाठी तुम्हाला दहा वर्षांचा अनुभव असायला हवा.
Mumbai | हजारो शेतकऱ्यांसह रविकांत तुपकर आज मंत्रालयावर धडकणार; बळाचा वापर केला तर.. तुपकरांचा इशारा
सल्लागार पदासाठी वय 35, वरिष्ठ सल्लागारासाठी 40, मुख्य सल्लागारासाठी 45, मुख्य सल्लागारासाठी 55 निश्चित करण्यात आलेले आहे. यानुसार उमेदवार पात्र ठरवले जातील. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट edcilindia.co.in जाऊ शकता. या वेबसाइटवर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम