Gold Silver Rate | सोने-चांदी खाताय भाव, असे आहेत आजचे दर..?

0
19
Gold scheme
Gold scheme

Gold Silver Rate | सध्या सोने-चांदीचे भाव हे वधारले आहेत. दिवाळीपासूनच सोने-चांदीची आगेकूच ही सुरु आहे. दिवाळीनंतरच्या प्रत्येक आठवड्यात सोने-चांदीने आलेख चढताच ठेवलेला आहे. आता या किंमती मे महिन्याचा सोने-चांदीचा किंमतींचा उच्चांकी विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. बघूयात आजचा सोने-चांदीचा दर..?

सोन्याची आगेकूच

दिवाळीपासून आतापर्यंत सोन्यात १,५०० रुपयांची दरवाढ झाली आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरांत ७०० रुपयांची वाढ झाली आहे. या आठवड्याची सुरुवातही दरवाढीनेच झाली. सोमवार (दि. २७) रोजी सोने हे २५० रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५७,५०० रुपये तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम इतक्या सोन्याचा दर हा ६२,७१० रुपये असा आहे.

चांदी १००० रुपयांनी वधारली 

चांदीनेही मोठी भरारी घेतली. १३ नोव्हेंबरपासून आजपर्यंत चांदीच्या दरांत ६,६०० रुपयांची दरवाढ झाली आहे. तर, २७ नोव्हेंबर रोजी चांदी १००० रुपयांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव हा आज ७८,५०० रुपये असा आहे.

मोठी बातमी | पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने नाशिककरांवरील पाणीपट्टी वाढीचं संकट टळलं!

असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ६१,४३७ रुपये तर, २३ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६१,१९१ रुपये असे आहेत. २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५६,२७६ रुपये असे आहे. १८ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ४६,०७८ रुपये असे आहेत. १४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ३५,९४१ रुपये पोहचले आहे. दरम्यान, एक किलो चांदीचा भाव हा आज ७३,०४६ रुपये वर पोहोचला आहे.

(वरील धातूंचे दर हे सूचक आहेत तसेच त्यात जीएसटी, टीसीएस व इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.)

Infotech news | आता अँड्रॉइडपेक्षाही स्वस्त किंमतीत मिळणार नवा आयफोन


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here