देवळा तालुक्यात अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांना फटका; पंचनाम्याची मागणी

0
24

सोमनाथ जगताप-प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुक्यात रविवारी (दि. २६) रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे वाजगाव, खर्डे येथील द्राक्ष उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला असून शासकीय यंत्रणेने याची दखल घेऊन पंचनामे करावेत आणि तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. देवळा तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. यामुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. यामुळे मका उत्पदनात मोठ्या प्रमणावर घट दिसून येत आहे. विहिरींनी तळ गाठल्याने लाल कांद्याची लागवड सुद्धा जेमतेम असून तालुक्यात नगदी पीक म्हणून ओळखले जाणाऱ्या उन्हाळी कांदा लागवडीसाठी तयार रोपे पाण्याअभावी इतरत्र ठिकाणी विकून टाकले आहे.

Infotech news | आता अँड्रॉइडपेक्षाही स्वस्त किंमतीत मिळणार नवा आयफोन

यामुळे तालुक्यात यावर्षी उन्हाळी कांद्याची लागवड देखील जेमतेम पहावयास मिळत आहे. यामुळे देवळा तालुक्यात यावर्षी भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील पूर्व भागात वाजगाव, खर्डे येथे अर्ली द्राक्ष उत्पादन घेणारे बहुतांश शेतकरी आहेत. त्यांनी पाणी टंचाईमुळे विकतचे पाणी घेऊन द्राक्ष बागा वाचवल्या आहेत. त्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसनाने ह्या द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने ह्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. यात प्रामुख्याने वाजगाव येथील द्राक्ष उत्पादक प्रमोद देवरे, प्रदीप देवरे,अमोल देवरे, राजेंद्र देवरे, राहुल देवरे, बापू देवरे, अक्षय देवरे, शैलेंद्र देवरे, गोटू देवरे, गणेश देवरे, हिरामण देवरे आदींचा समावेश आहे.

Crime news | सोन्याचे दागिने लांबवलेच पण, तरुणीचेही केले अपहरण
गेल्या दोन तीन दिवसांपासून तालुक्यात अभ्राछदित वातावरण, अवकाळी पाऊस, यानंतर पडलेले दाट धुके यात काढणीयोग्य असलेल्या लाल कांद्याचे त्याच प्रमाणे द्राक्ष, टोमॅटो, कांदा रोप आणि इतर भाजीपाला पिके नेस्तनाभुत झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. आधीच कोणत्याच शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असताना यात अवकाळी पाऊसामुळे हाता-तोंडाशी आलेल्या पिकांची झालेली वाताहात पाहून शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.
शासकीय यंत्रणेने याची तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त फळबागापाठोपाठ इतर पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

अत्यंत मेहनत आणि महागडी औषधांची फवारणी करून द्राक्ष बागा जतन केल्या आहेत. मात्र अभ्राच्छदित वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे खर्च देखील वसूल होतो की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. पंचनामा करून तुटपुंजी मदत मिळत असेल तर ती शेतकऱ्यांची क्रूर थट्टा होईल याकरिता लोकप्रिनिधींनी लक्ष केंद्रित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत कशी मिळेल यासाठी प्रयन्त करावेत. – अमोल देवरे , द्राक्ष उत्पादक शेतकरी, वाजगाव (ता. देवळा)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here