Nashik News | अंजली दमानिया यांच्या आरोपांवर स्पष्टच बोलले समीर भुजबळ

0
43

Nashik News |  राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ हे आज सकाळी ११ वाजता नाशिक येथे महत्वाच्या विषयावर माध्यमांशी संवाद साधत होते. दरम्यान, त्यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. यात करारानुसार मोबदला दिल्याचे समी र भुजबळ यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सांताक्रूझ येथील आमच्या निवासस्थानाबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. सध्या राज्यात ओबीसींची मोठी लढाई आम्ही लढत आहोत. काल झालेली सभा पाहता यात राजकारण करण्यासाठी अंजली दमानिया यांनी हा मीडिया स्टंट केला. याप्रकणी, माणुसकीच्या नात्यातून आम्ही मोबदला देण्याची तयारी दर्शविली. पण, तरीही  दमानिया यात राजकारण आणून आपली पोळी भाजून घेत आहेत. अशी टीका समीर भुजबळ यांनी यावेळी केली.

दरम्यान, पुढे स्पष्टीकरण देताना ते बोलले की, सदर जागा हि बॉम्बे ख्रिश्चन ट्रस्टच्या मालकीची असून, श्रीमती शैला अथायडे या जागेच्या मालक होत्या आणि त्यांनी सदर जागेसंबंधीचे हक्क त्यांचे भाऊ फर्नांडिस ह्यांना दिले होते.

ह्या प्रकरणी फर्नांडिस कुटुंबीयांनी सर्वप्रथम मेसर्स पाल्म शेल्टर्स ह्या कंपनीसोबत व्यवहार केला. त्यांनी १० वर्षे काहीच  काम न केल्यामुळे फर्नांडिस हे डेव्हलपर्सच्या शोधात होते. त्यानुसार आमच्या मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ते संपर्कात आले .

Nashik news | नाशकात हे घडतंय काय..? चिमुकल्याला तव्याचे चटके, मग लाथाबुक्क्यांनी मारहाण

त्यानुसार फर्नांडिस यांना त्या सोसायटीत फ्लॅट्स देण्याच्या करारानुसार आमच्या कंपनीने सर्व मोबदला हा फ्रेडरिक नर्होणा ह्यांना दिला होता त्याबदल्यात जागेसंबंधीचे हक्क हे आमच्या कंपनीला मिळाले होते.

पण, २००५ मध्ये आम्ही करार रद्द करण्याची भूमिका घेतली. आम्ही नर्होणा यांच्याशी संपर्क केला असता त्यांचे बांधकाम सुरु आहे, लवकरच त्यांना पझेशन देण्यात येईल असे सांगितले. पण, त्यांच्याकडून फ्लॅट घेण्याबाबत फर्नांडिस यांनीच नकार दिला होता.

यानंतर माणुसकीच्या नात्याने फर्नांडिस कुटुंबीयांशी आम्ही संपर्क केला. २०१४ साली समक्ष भेटून फ्लॅटच्या मोबदल्यात पैसे देण्याचे त्यांनी मान्य केले व त्यासाठी बॉम्बे ख्रिश्चन ट्रस्टला पत्र सुद्धा दिले. कि परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या नावे लिझ ट्रान्सफर करावी. पण, त्यावेळी फर्नांडिस यांनी व्यवहार केला नाही. व पुन्हा पैसे घेण्यास नकार दिला.

नंतर फर्नांडिस कोर्टात गेले पण, कोर्टाने त्यांची याचीका फेटाळली आणि त्यांना ट्र्याबूनल मध्ये जायला सांगितले पण, त्यानंतरही त्यांनी ट्र्याबूनल मध्ये दाद मागितली नाही.

दरम्यान, अंजली दमानिया ह्या फर्नांडिस कुटुंबीयांना पुढे करून यात राजकारण करत राहिल्या त्यांना पुढे करून फर्नांडीस कुटुंबीयांना कोणताही लाभ घेऊ दिला नाही. आमची तयारी असतानाही फर्नांडीस कुटुंबीयांनी व्यवहार पार पाडला नाही.

Gold-Silver Price |  सोन्याला पुन्हा अच्छे दिन!; पाहा आजचा भाव

विशेष बाब म्हणजे मागील वर्षी श्रीमती अंजली दमानिया ह्यांनी सुप्रियाताई सुळे ह्यांच्या मार्फत संपर्क साधला व त्यांना मध्यस्ती करण्याची विनंती केली. ह्याबाबत आम्हाला विचारणा केली असता आमच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. त्यावेळी क्लाउड फर्नांडिस यांचे निधन झाल्याचे आम्हाला समजले तेव्हा सुरुवातीलाच रु. ५० लक्ष रुपयांचा धनादेश आम्ही विनाअट देऊ केला होता. तो त्यांनी स्वीकारलाही परंतु बँकेत जमाच केला नाही किंवा त्यांना जमा करू दिला नसावा.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here