crime news | फॅशनेबल बांगड्या घातल्या म्हणून पत्नीला अमानुषपणे मारहाण

0
45

crime news | केवळ नव्या आणि फॅशनेबल बांगड्या घातल्या म्हणून एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्यांनी व नवऱ्याने बेदम मारहाण केलीआहे. ही घटना घडली आहे मुंबईत. नवी मुंबईतील दिघा येथे ही संतापजनक घटना घडली आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेचा नवरा व सासरच्यांविरोधात, अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, २३ वर्षीय विवाहीत महिलेच्या फिर्यादीवरून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार, पीडितेचा पती प्रदीप अरकडे (वय ३०) हा फॅशनेबल बांगड्या घालण्या विरुद्ध होता व या मुद्द्यावरून त्याने पत्नीशी वाद घातला.

नातेवाईक मध्ये पडले तरीही केली मारहाण

१३ नोव्हेंबर रोजी हा सर्व प्रकार घडला. त्या दिवशी पीडित महिलेशी वाद झाल्यानंतर तिच्या ५० वर्षीय सासूने तिचे केस धरून तिला ओढलं व तिला मारहाण केली. तिचा पतीदेखील या मारहाणीत सामील होता, त्याने पीडितेला अमानुषपणे बेल्टने मारहाण केली.

हे सगळं घडताना तिच्या सासरचे इतर नातेवाईकही तिथे उपस्थित होते. पण, ते मध्ये पडून हा प्रकार थांबवण्याऐवजी, त्यांपैकी एका महिलेनेही पीडितेला मारहाण केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आलेलं आहे.

yeola | येवल्यात प्रवाशांनी भरलेल्या मारुती व्हॅनचा गॅस भरताना स्फोट

माहेर गाठले व पोलिसांत केली तक्रार

या प्रकारामुळे पीडित महिलेने पुण्याला तिच्या माहेरी धाव घेतली. आणि तेथे जाऊन नवरा व सासरच्यांविरुद्ध   पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण चौकशीसाठी नवी मुंबई येथे ट्रान्स्फर केले आहे. असे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पीडितेचा नवरा व तिच्या सासरच्या सासरच्यांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३२३ (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), ३२४ (धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी स्वेच्छेने दुखापत करणे), ३४ (सामान्य हेतूने), ५०४ (उत्तरभंगास चिथावणी देण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

UGC Net Exam | युजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here