Nashik | नाशिक येथे आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण श्री. पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथा नाशिक येथे दिनांक २१ ते २५ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या मंडपाचे भूमिपूजन आज (दि. १४) रोजी नाशिकचे पालकमंत्री दादा भूसे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महंत भक्ती चरणदास महाराज यांच्या हस्तेदेखील भूमिपूजन करण्यात आले.
Malegaon | मालेगावच्या थिएटर मालकाने भाईजानच्या चाहत्यांची मस्ती उतरवली
श्री शिवमहापुराण कथा नक्की होणार कुठे?
नाशिक येथील भवानी माथा, दोंदे मळा, जाधव पेट्रोलपंप समोर, पाथर्डी गाव येथे हा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. तसेच या ठिकाणी संपूर्ण श्री शिवमहापुराण कथा कार्यक्रम पार पडणार आहे. आज (दि. १४) रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ११ वाजता श्री शिवमहापुराण कथा मंडपाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे.
Nashik News | नाशिक विकायचं आहे! सोशल मीडियावर पोस्ट झाली व्हायरल
या भूमिपूजन सोहळा कार्यक्रमात खा. हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे, भाऊ चौधरी, अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे, सुवर्णा मटाले, रामराव पाटील, सचिन भोसले, सुदाम डेमसे, भगवान दोंदे, अमोल जाधव, शाम साबळे, दिनकर पाटील, कांचन पाटील, निलेश गाढवे, अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे, धनंजय बेळे, रंजन ठाकरे, प्रशांत बछाव, आदी पदाधिकारी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम