Nashik | पनीर खरेदी करतांय… तर सावधान! नाशकात 397 किलो बनावट पनीर केले हस्तगत

0
40

Nashik | गणपती, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांच्या काळात मिठाई तसेच दुग्धजन्य पदार्थांची बाजारात मोठी मागणी असते. याच काळात अन्नपदार्थात भेसळीच्याही अनेक घटना समोर येत असतात. मागील 2-3 महिन्यापासून अन्न आणि औषध प्रशासन विभाग सतर्क झाला असून एक धडक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. अशीच एक मोठी कारवाई करत तब्बल 397 किलो बनावट पनीर हस्तगत करण्यात अन्न आणि औषध प्रशासनाला यश मिळालेले आहे. नाशिक शहरातील त्रिमूर्ति चौक आणि अंबड परिसरात दोन ठिकाणी छापा टाकून बनावट पनीर ताब्यात घेण्यात आलेले आहे. या पनीरची किंमत तब्बल 84 हजार रुपयांच्या घरात आहे.

नाशिक शहरात ऐन दिवाळीत जमावबंदी आदेश लागु; किती दिवस जमावबंदी लागु?

बुधवारी (दि. 08) रोजी नवीन नाशिक विभागातील त्रिमूर्ति चौकातील मे. विराज एंटरप्राइजेस या ठिकाणी छापा टाकून 74 किलो तर गुरुवारी अंबड परिसरातील साईग्राम कॉलनी येथील मे. साई एंटरप्राइजेस येथून तब्बल 323 किलो बनावट पनीर हस्तगत करण्यात आलेले आहे. दोन्ही ठिकाणी हस्तगत करण्यात आलेले एकूण 397 किलो पनीराचे अन्ननमुने पुढील विश्लेषणासाठी पाठवण्यात आलेले असून बाकी साठा नष्ट करण्यात आला आहे.

मागील दोन महिन्यांपासून गणपती, नवरात्र, दसरा तसेच दिवाळीच्या अनुषंगाने अन्न आणि औषध प्रशासन सतर्क झालेला आहे. मागील दोन महिन्यापासून प्रशासनाकडून धडक मोहिमेला सुरवात करण्यात आली आहे.  तसेच शहरात विविध ठिकाणी अचानक अचानक छापे टाकून अन्न नमुने ताब्यात घेतले जात आहेत. याच अंतर्गत गुप्त वार्ताहारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न आणि औषध प्रशासनाने बुधवारी त्रिमूर्ति चौकातील मे. विराज एंटरप्राइजेस तर गुरुवारी अंबड येथील साईग्राम कॉलनी येथील मे. साई एंटरप्राइजेस याठिकाणी छापा टाकून बनावट पनीर हस्तगत केलेले आहे. वरील दोन्ही ठिकाणावरून अनुक्रमे 74 आणि 323 किलो बनावट पनीर हस्तगत करण्यात आलेले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त म.मो.सानप आणि वि.पा. धवड यांच्या नेतृत्वात सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील, अविनाश दाभाडे, नि. खं. साबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

चोरीला गेलेला ट्रॅक्टर आरोपींसह ताब्यात; देवळा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

प्रशासनाने केले आवाहन 

नागरिकांनी दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना खरच त्यामध्ये दूध, मलाई, खवा आहे का याची खात्री करावी त्यासोबतच विक्रेत्यांनीही दुग्धजन्य पदार्थच विक्री करावे. कुठला पदार्थ दुग्धजन्य नसल्यास तसे स्पष्ट शब्दात लिहायला हवे. यासह हॉटेल चालकांनी बनावट पनीरचा वापर अन्न पदार्थ बनवताना करू नये, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेला आहे. यासह नागरिकांना कोणत्याही अन्न पदार्थांच्या दर्जा बाबत कोणताही संशय असल्यास त्यांनी 1800 222 365 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेलं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here