Crime news | नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथील एका विहिरीत ४० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे.
याबाबत, वणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोल्हेर शिवारातील बाळू पांडुरंग वाघ यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यात एका तरुणीचा मृतदेह तरंगताना शेतमालक बाळू वाघ यांना दिसला होता.
याबाबत, त्यांनी गावचे पोलिसपाटील राजेंद्र दौलत गायकवाड यांना माहिती दिली. पाहणी केल्यानंतर पोलिसपाटलांनी याप्रकरणी वणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने विहिरीतून कुजलेल्या अवस्थेत असलेला बेपत्ता तरुणीचा मृतदेह बाहेर काढला.
Maharashtra politics | शपथ घेण्यापूर्वी मी दोन तास प्रॅक्टीस केली – डॉ. भारती पवार
दरम्यान, मृत तरुणीची ओळख पटली असून, निर्मला यशवंत पवार (वय १९) असे तिचे नाव आहे. अस्वलीपाडा येथील शेतातील घरातून २५ सप्टेंबर २०२३ पासून ही तरुणी बेपत्ता होती. २७ सप्टेंबरला तरुणीच्या पालकांनी दिलेल्या माहितीवरून वणी पोलिसांत तरुणी बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.
तब्बल ४० दिवसांनतर तरुणीचा मृतदेह हा शिवरतील एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण साबळे यांनी जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन केले.
Nashik News | बागलाणचे अर्ली द्राक्ष दुबई-रशियाला रवाना; दीवाळीचा मुहुर्त
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम