Crime News | नवरा चांगला दिसत नसल्याने पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संभल येथे २६ वर्षीय महिलेने नवरा चांगला दिसत नसल्याने त्याला पेटवून त्याची हत्या केली आहे. यानंतर आता आरोपी महिलेला चार वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आरोपी महिलेने २०१७ मध्ये कुर्ह फतेहगढ येथील बिचेटा येथील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय सत्यवीरसोबत लग्न केलं होतं. पण, तिचा नवरा हा काळा असल्याने त्यांच्यात कायम वाद व्हायचे. तिने वारंवार त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली होती. तरीही सत्यवीर मात्र, लग्न टिकवण्यासाठी प्रयत्न करत होता.
त्यांना नोव्हेंबर २०१८ मध्ये एक मुलगीही झाली. पण, पत्नीच्या मनात पती वाईट दिसत असल्याचा कायम राग होता. त्या रागातूनच पती झोपेत असताना पत्नीने त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Nashik Crime | लग्नाचं आमिष देऊन तरुणीला जेवणातून गर्भपाताच्या गोळ्या; तरुणीचा 3 वेळा गर्भपात
यासंबंधी सत्यवीरचा भाऊ हरवीरने गुन्हा दाखल केला असून, त्यानुसार पत्नीला अटक करण्यात आली आहे. कोर्टाच्या निकालानुसार, पतीने मृत्यूआधी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच पत्नीने हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले होते.
मुरादाबाद जिल्हा रुग्णालयात असताना सत्यवीरने पोलिसांना सर्व माहिती दिली होटी. ‘मी बायकोला तिच्या माहेरी घेऊन गेलो होतो. तिथे तिच्या नातेवाईकांनी मला सांगितले की, तिला मी आवडत नाही आणि तिला मला घटस्फोट द्यायचा आहे. त्याच रात्री आम्ही दोघे घरी परतलो. नंतर दुसऱ्या दिवशी मी झोपेत असताना माझ्या पत्नीने मला पेट्रोल टाकून पेटवले’. असे सत्यवीरने सांगितले होते.
यामुळे त्यांच्या लग्नाचे भयानक वास्तव समोर आहे. लग्न झाल्यापासून मी चांगला दिसत नसल्यामूळे माझ्या पत्नीला मी कधीच आवडत नव्हतो. यावरुन ती अनेकदा माझ्याशी भांडायची. माझा रंग खूप काळा आहे म्हणून, एकतर मी तिला सोडावे नाहीतर, ती मला पेटवून देईन. अशी धमकी टी द्यायची. मात्र, आज तिने ही धमकी सत्यात उतरवली, असे तो म्हणाला. त्यानंतर काहीच काळात त्याचा मृत्यू झाला.
Army vehicle accident | जबलपूरजवळ सैन्य दलाच्या गाडीला भीषण अपघात
सत्यवीरच्या भावाने त्याला शेतात चहा आणायला सांगितले. पण, बराच वेळ झाला तरी भाऊ चहा घेऊन आला नाही म्हणून हरवीर त्याला बघायला घरी आला व त्याला घडलेले सर्व समजले. त्याने वाहिनी प्रेमश्रीच्या विरोधात पोलीसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी प्रेमश्रीला अटक केली व घटनेशी संबंधित सर्व साक्षीदार व पुरावे नायायालयात सादर केले. न्यायालयाने प्रेमश्रीला दोषी ठरवत तिला २५ हजार रुपयांचा दंड आणि जन्मठेप सुनावली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम