Crime News | तिचं नक्की चुकलं काय? सरकारी महिला अधिकाऱ्याची भोसकून हत्या

0
25

(Crime News) बंगळुरु | नुकतीच एक खळबळजनक घटना घडलेली आहे. मोठ्या हुद्दयावर असलेल्या वरिष्ठ महिला सरकारी अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. आरोपीने घरात घुसून केएस प्रतिमाची हत्या केलेली होती. केएस प्रतिमा या कर्नाटक सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणुन कार्यरत होत्या. सोमवारी या प्रकरणी बंगळुरु पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. आरोपीचं नाव किरण आहे. आरोपी कर्नाटक सरकारमध्ये कंत्राटी कर्मचारी होता. प्रतिमा यांनी किरणला काही दिवसांपूर्वी नोकरीवरुन बर्खास्त केलेलं होतं. तो राग किरणच्या मनात होता आणि त्याचा रागातून त्याने केएस प्रतिमाची हत्या केली.

देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भाग्यश्री पवार तर उपनगराध्यक्ष पदी मनोज राजाराम आहेर बिनविरोध

प्रतिमा यांची हत्या करुन किरण चामराज नगर जिल्ह्यात पळून गेलेला होता. सोमवारी त्याला चामराज नगर जिल्ह्यातून अटक करण्यात आली.

“प्रतिमा हत्या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतलेलं आहे. दक्षिण बंगळुरुचे डीसीपी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. माली महाडेश्वर हिल्स येथून या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपी ड्रायव्हर होता, त्याला 7 ते 10 दिवसांपूर्वी कामावरुन काढून टाकण्यात आलेलं होतं” अशी माहिती बंगळुरुचे पोलीस आयुक्त बी.दयानंद यांनी दिली आहे.

Crime News | आईचा डोळा लागला आणि १० महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू

खात्यामध्ये एक प्रतिष्ठा होती

“किरण कॉन्ट्रॅक्टवर होता आणि त्याला काही दिवसांपूर्वी नोकरीवरुन काढून टाकल्याचं आम्हाला समजलं” असं दयानंद यांनी सांगितलेलं आहे. प्रतिमा यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या कुटुंबातील सदस्याने सांगितलं की, “त्या धडाडीच्या महिला अधिकारी होत्या. छापा टाकणं असो किंवा अन्य कारवाई त्यांची खात्यामध्ये एक प्रतिष्ठा आणि दरारा होता. अलीकडेच त्यांनी काही ठिकाणी छापेमारीची कारवाईही केली”. प्रतिमा यांनी काम करुन आपली नविन ओळख तयार केली होती.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here