Nashik | धक्कादायक! जिल्ह्यात ५ वर्षांपासून मुलींच्या जन्मदरात घट; चिंताजनक आकडेवारी समोर

0
23

Nashik | स्त्री जन्मदर वाढीसाठी शासकीय स्तरावर विविध प्रयत्न केले जात असतात. तरीही नाशिक सारख्या स्मार्ट सिटीमध्ये मुलींच्या जन्मदरात अद्याप मोठी तफावत असल्याचे प्रत्यक्ष आकडेवारीतून समोर येते आहे. मागील पाच वर्षांत मुलींच्या जन्मदरात ३९ आकड्याने घट नोंदवण्यात आलेली आहे. 2018 मध्ये 970 असलेले लिंग गुणोत्तर यंदा 931 वर येऊन ठेपल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

नाशिक | आहेर बंधूंचे फडणवीसांना साकडे; चांदवड-देवळा होणार का दुष्काळ जाहीर?

केंद्र आणि राज्य सरकार, तसेच सामाजिक पातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असतानाही मुलींच्या जन्मदराबाबत समोर येणारी आकडेवारी धक्कादायक मानली आहे. विशेष म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सधन मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये हे प्रमाण घटते असून सध्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये त्या तुलनेत दिलासादायक परिस्थिती दिसत आहे. यंदा जिल्ह्यातील देवळा आणि पेठ या अवघ्या दोन तालुक्यांत लिंग गुणोत्तर सकारात्मक आहे. येवला, बागलाण, दिंडोरी, निफाडसारख्या तालुक्यांमध्ये आठशेच्या आत लिंग गुणोत्तर समोर आलेली आहे.

कठोर उपाययोजनाची गरज
सरकारकडून मुलींसाठी अनेक शासकीय योजना राबवण्यात येतात. या माध्यमातून मुलींच्या जन्मापासून मोफत शिक्षणापर्यंत संधीही सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय ‘सुकन्या समृद्धी योजना’, ‘माझी कन्या भाग्यश्री’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अशाही विविध योजना मुलींसाठी राबविल्या जात आहेत. असे असतानाही मुलींच्या जन्मदरात सातत्याने घट होत असल्याचे दिसून येते आहे.

Nashik | जायकवाडी पाणी प्रश्न पेटणार; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा 

पाच वर्षांचे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर

  • २०१८ : ९६९
  • २०१९ : ९६३
  • २०२० : ९५९
  • २०२१ : ९४५
  • २०२२ : ९३१
तालुकानिहाय लिंग गुणोत्तर
  • पेठ : ११३१
  • देवळा : १००८
  • त्र्यंबकेश्वर : ९८२
  • चांदवड : ९६९
  • इगतपुरी : ९४६
  • नाशिक : ९३४
  • मालेगाव : ९३४
  • कळवण : ९३२
  • नांदगाव : ९३०
  • सिन्नर : ९२९
  • सुरगाणा : ९२०
  • बागलाण : ८९९
  • येवला : ८९९
  • दिंडोरी : ८८९
  • निफाड : ८७९
  • एकूण : ९३१

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here