Education scam: हिरेंच्या शिक्षण संस्थेने शासनाचे लाखो रुपये लुबाडले!

0
32

Education scam: शिक्षक भरतीचे घोटाळे हे राज्याला काही नवे नाही. असाच काहीसा मोठा घोटाळा नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या हिरे कुटुंबियांच्या संस्थेतील पदाधिकारी, शिक्षक व शिपाई यांनी संगनमत करून शासनाकडून वेतनापोटी लाखो रुपये वसूल केले आहे. यासाठी जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी हाताशी धरून हा आर्थिक घोटाळा केल्याने शिक्षण वर्तुळासह राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Nashik Crime | सटाण्यात ५ कॅफेंवर पोलिसांची धडक कारवाई

याबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शहरातील महात्मा गांधी विद्या मंदिर या शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळातील 25 पदाधिकारी, सदस्य, तत्कालीन मुख्याध्यापक, 22 शिक्षक, 12 शिपाई व 6 लिपीक यांनी 1 जानेवारी 2008 ते 2 नोव्हेंबर 2023 या कालावधीत सगळ्यांनी संगनमत करून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्याकडे मान्यतेचे प्रस्ताव पाठवले. त्यांनीही कोणतीही शहानिशा न करता आणि राजकीय ताकदीमुळे नियमबाह्य मान्यता दिली. परिणामी, शासनाची वेतनापोटी लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी शिक्षण उपनिरीक्षक डॉ. किरण कुंवर यांनी भद्रकाली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन संचालक मंडळ पुष्पाताई व्यंकटराव हिरे, पंडीत दगा नेरे, स्मिताताई प्रशात हिरे, प्रशांत व्यंकटराव हिरे, दिपक रामराव सुर्यवशी, डॉ अपूर्व प्रशांत हिरे, अद्वय प्रशांत हिरे, प्रमोद दत्तात्रेय भार्गवे, प्रदिप नारायण सराफ, मनोज गुलाबभाई बंदीयाणी, अरुण गोविंदराव उगिकर, उदय वसंतराव शिंदे, डॉ.योगिता अपूर्व हिरे, संपदा प्रशात हिरे, ललीता प्रमोद भार्गव, रवि शंकर मनोहर शुक्ला, सुजाता राजेश शिंदे सभासद, इद्रलाल झुलाल देसले, राजेश शशिकांत शिंदे, सदाशिव रामभाउ, संजय दगु कुठे सभासद, तसेच तपासादरम्यान निष्पन्न होणारे इतर संचालक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच संबधीत शाळांचे तत्कालीन मुख्याद्यापक व शिक्षक सहारे मोहन नामदेव, के. बी. एन विद्यालय, करंजाळी, ता पेठ जि.नाशिक,  अहिरे सुनिल अशोक, के. बी. एच विद्यालय, करंजाळी, ता पेठ विद्यालय हरसुल, ता अंबकेश्वर, जि.नाशिक, पवार यशवंत शिवाजी. के. बी. एच जि.नाशिक, पवार विलास मोतीराम, प.पु. ओम दत्त श्री. ठाकुर महाराज माध्यमिक विद्यालय, सप्तश्रृंगी गड, ता. कळवण, जि.नाशिक, बोरसे नंदकुमार तुळशिराम, माध्यमिक विद्यालय हाताणे ता मालेगाव, येळवे राकेश लालसिंग. माध्यमिक विद्यालय हाताणे ता मालेगाव जि.नाशिक, परदेशी जयश्री राजेंद्रसिंग लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालय, सावता नगर, सिडको लिपीक सोनवणे आकाश दौलतराव केबीएच विद्यालय, वडाळा तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रविण पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दिनांक ०२/११/२०२३ रोजी भद्रकाली पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे फिर्यादी डॉ. किरण जयप्रकाश कुंवर शिक्षण उप निरिक्षक यांनी समक्ष उपस्थित राहून सरकारी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. दिनांक १/९/२००७ रोजी ते दिनांक ०२/११/२०२३ रोजी पोवती जिल्हा परिषद शिक्षण विभाग, नाशिक शहर या ठिकाणी महात्मा गांधी विद्या मंदिर, नाशिक या संस्थेच्या माध्यमिक शाळाचे कालीन संचालक मंडळ एकूण २५ पदाधिकारी व सदस्य तत्कालीन मुख्याध्यापक यानी एकुण २२ शिक्षक, १२ शिपाई लिपी अशांनी संगनमत करून नियमबाह्य जिल्हा परिषदेस मान्यतेचे प्रस्ताव पाठवुन तत्कालीन शिक्षणा अधिकारी (माध्यमिक) श्री प्रविण पाटील यानी नियमबाहय मान्यता देवून फसवणुक केली व वेतनापोटी रुपये लाखो रुपयांचा अपहार करुन शासकीय निधीचा अपव्यय केला आहे. 420, 406,467, 468, 471, 34, अनुसुचित जमाती विजाती विशेष मागासप्रवर्ग अनि २००१ या प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here