Nashik Crime | सटाण्यात ५ कॅफेंवर पोलिसांची धडक कारवाई

0
32
Cafe Raid
Cafe Raid

Nashik Crime | नाशिकच्या सटाणा येथे कॉफी शॉपच्या नावाखाली युवक-युवतींना अश्लील चाळे करण्यासाठी छोटे कॅबिन उपलब्ध करून देणाऱ्या सटाणा शहरातील पाच कॉफी शॉपवर पोलिसांनी अचानक छापा टाकला.

यावेळी कॉलेजला दडी मारून कॉफीचा आस्वाद घेणाऱ्‍या तरुण-तरुणींना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवत त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. तर, कॅफे मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही वर्षांपासून शहरातील तथा जिल्ह्यातील विविध भागात कॅफेजचा सुळसुळाट आहे. स्वतंत्रपणे बसण्याची व्यवस्था असल्याने कॅफेजमध्ये तरुण-तरुणींची गर्दी असते.

ग्रामीण भागातील महाविद्यालयीन युवक-युवती सकाळी कॉलेजच्या नावाने घराबाहेर पडतात आणि महाविद्यालयाला दांडी मारून शहरातील कॉफी शॉपवर प्रायव्हसी घेत असल्याची माहिती सटाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप रणदिवे यांना मिळाली होती.

दरम्यान, रणदिवे यांनी साध्या वेशात सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील आणि उज्ज्वलसिंग राजपुत तसेच महिला पोलिस उपनिरीक्षक विजया पवार यांना प्रत्यक्ष कॉफी शॉपवर जाऊन याची खातरजमा करण्याचे निर्देश दिले होते.

Deola| कांदा उत्पादकांचं वादळ मंत्रालयावर धडाडणार

त्या अनुषंगाने काही कॉफी शॉपमध्ये अंधक वातावरण निर्माण करून तरुण-तरुणींना प्रायव्हसी दिली जात होती. तर कॉफीच्या नावाने अश्लील चाळे सुरू असल्याचे प्रकार देखील पोलिसांना आढळले. दरम्यान, सकाळी शहरातील पाच कॉफी शॉपवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांना पाहताच कॉफी शॉपमधील तरुण-तरुणींची एकच धावपळ उडाली.

एकांताचा फायदा घेत मौजमस्ती करणाऱ्‍या युवक-युवतींची कानउघाडणी करत पोलिसांनी सर्वांना अद्दल घडवली. यानंतर या युवक-युवतींची पोलीस ठाण्यात हजेरी घेऊन कानउघाडणी करीत त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले गेले. दरम्यान, सटाणा शहरातील ५ कॉफी शॉपवर एकाचवेळी धडक कारवाई केल्याने महाविद्यालयीन तरुणांना चांगलीच धडकी भरली आहे.

पोलिसांनी संबंधित कॅफे मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस नाईक बाळासाहेब निरभवणे, नितीन जगताप, सविता कावळे, योगेश साळुंके, कैलास घरटे, यांनी ही कारवाई केली आहे.

कोकणगाव येथे मराठा समाजाचा साखळी उपोषणाचा एल्गार


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here