Crime News | बेवड्यांनो जरा सुधरा रे…! ; अपघात झाला तरी बाटल्या पळवता

0
33

Crime News | अनेक राज्यांत दारुबंदी असूनही बेकायदेशीरपणे दारु विक्री केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. सध्या बिहारमधील अशाच एका व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ह्या व्हिडिओत एका कारचा अपघात झाल्यानंतर तिथे उपस्थित लोकांनी ड्रायव्हरला वाचवण्याऐवजी चक्क गाडीमधील दारु पळवून नेत असल्याचे ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

 दारूबंदी असलेल्या बिहार राज्यात विषारी दारू तसेच अवैध दारू तस्करी यामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. ३० ऑक्टोबर रोजी सिवानमधून दारू लुटल्याचा व्हिडिओ समोर आला होता. दरम्यान, आता गयामध्येही असाच काहीसा प्रकार उघडकीस अला आहे. ज्यामध्ये लोकांच्या अशा माणुसकीला काळीमा फसणाऱ्य कृतीवर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Crime News | उधार किराणा दिला नाही; म्हणून दुकान मालकाला मारहाण…

गया येथील डोभी-चतरा रस्त्यावर चतरा वळणावर सोमवार (दी. ३० ऑक्टोबर) रोजी संध्याकाळी एक अपघात घडला. विदेशी दारूने भरलेल्या एक कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात घडला. ह्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तिकडे धाव घेतली खरी, पण लोकांनी जखमी व्यक्तींना मदत करण्याऐवजी, चक्क गाडीतील दारुच पळवायला सुरूवात केली.

अपघातातग्रस्त कारचा ड्रायव्हर किंवा इतर गाडीतील व्यक्ती कसे आहेत? कोणाला काही गंभीर दुखापत झाली असेल याची साधी कोणी विचारपूसही करत नसून, सर्व उपस्थित हे दारूच्या बाटल्या पळवताना दिसत आहे. दारुपुढे कोणाच्या जिवाची पर्वा नाही का? असे सवाल काही युजर्सनी विचारले आहेत.

Deola | तालुक्याच्या दुष्काळ यादीत समावेश करा; ‘ऊबाठा’ आक्रमक


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here