Nashik News | आरक्षण नाही, तर दिवाळी नाही! सकल मराठा समाजाने घेतला मोठा निर्णय

0
44

Nashik News | आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा सरकार अंत पाहत आहे. आमच्या घरातील दिवा विझविण्याचा प्रयत्न सरकार करत असेल, तर दिवाळीत एकाही मराठ्याच्या घरात दिवा पेटवला जाणार नाही. मराठा समाज यंदा काळी दिवाळी साजरी करणार आहे. आरक्षण मिळाल्यानंतरच दिवाळी साजरी करण्यात येईल,’ असा निर्धार नाशकातील सकल मराठा समाजाने बुधवारी व्यक्त केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकरिता सुरू असलेल्या राज्यातील आंदोलनाला पाठबळ देण्याकरिता सकल मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आलेली होती. सीबीएस येथील छत्रपती शिवाजी स्मारकाच्या आवारात झालेल्या या बैठकीला मराठा समाजातील विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

JEE Main 2024 Updates | सत्र 1 साठी कसा करावा अर्ज? जाणुन घ्या संपुर्ण माहिती

निफाड शहरातून सर्वपक्षीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला होता. येथे चार तरुण बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी निफाड शहरातून काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झालेले होते. येवला तालुक्यातील रास्ते सुरेगाव आणि अंगणगाव येथे नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बुधवारी सकाळी मराठा समाजबांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. कायमच गजबज असणारी त्र्यंबकेश्वरनगरी दोन दिवसांपासून शांत झालेली आहे. राज्यातील बीड आणि अन्य काही भागात बसची जाळपोळ, अनेक भागात बंद, रोखलेले रस्ते यामुळे भाविकांचा ओघ थांबलेला आहे. माडसांगवी-शिलापूर टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर चांदवड तालुक्यातील निंबाळे पंचक्रोशीतील संतप्त मराठा समाजबांधवांनी बुधवारी सकाळी मनमाड-लासलगाव रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

नाशिककरांनो दिवाळीत फटाके फोडताना जरा सांभाळून; नाशिक जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जाहीर

कोनशिलेवरील भुजबळांचे नाव खोडले
निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथे बुधवारी सकाळी अन्न आणि औषध प्रशासनमंत्री छगन भुजबळ यांचे नाव असलेली कोनशिला मराठा आंदोलकांनी फोडून त्यांचे नाव खोडलेले आहे. सारोळे खुर्द येथे 24 ऑक्टोबर रोजी झालेल्या विकासकामांच्या उद्घाटनाच्या कोनशिलेवर उद्घाटक म्हणून असलेले छगन भुजबळ यांचे नाव मराठा आंदोलकांनी छनीने फोडून टाकले आहे. भुजबळ यांचा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध असल्याने त्यांचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here