Nashik News | मराठा आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असताना राज्यातील अनेक जिल्ह्यात बसेसची तोडफोड करण्यात आलेली आहे. त्यामुळे याच पार्श्वभुमीवर अनेक जिल्ह्यातदेखील बससेवा बंद करण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये देखील आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेत नाशिकहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बससेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलेला आहे. त्यानुसार आज सकाळपासून मराठाड्याकडे धावणाऱ्या बसेस फेऱ्या रद्द करण्यात आली असून यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
नाशिक शहरात डेंग्युचा वाढता कहर; प्रशासन आलं अलर्ट मोडवर
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम राज्यातील एसटी महामंडळाच्या बससेवांवर जाणवू लागलेला आहे. कालपासून मराठवाड्यातील एसटीच्या सगळ्या फेऱ्या रद्द झालेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. नाशिकमधूनही मराठवाड्याकडे जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सकाळपासून एकही बस छत्रपती संभाजीनगर, जालनाच्या दिशेने गेलेली नाही. तसेच मराठवाड्याकडून नाशिकला एकही बस मुक्कामी आली नसल्याचे एसटी महामंडळ वाहतूक नियंत्रकाकडून सांगण्यात आलेले आहे. यामुळे मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत असून आज सकाळपासून नाशिकच्या ठक्कर बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनाचा एसटी महामंडळाच्या बससेवांवर परिणाम जाणवतो आहे. त्यामुळे नाशिकहुन मराठवाड्यात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर मराठवाडातुन एकही बस नाशिकला मुक्कामी आली नाही. नाशिक डेपोतुन 12 बस छ. संभाजीनगरच्या दिशेने जातात. छ. संभाजीनगरहुन साधारणपणे 20 बस नाशिकला येत असतात. तर जालना, वाशीम अशा इतर डेपोच्या साधारणपणे 25 बसही आलेल्या नाहीत. त्यामुळे खासगी बस, रेल्वे किंवा खाजगी वाहतुकीचा प्रवाशांना आधार घ्यावा लागतो आहे. दुसरीकडे बससेवा कधी सुरळीत होणार याबाबत एसटी महामंडळ अधिकाऱ्यांकडे कोणतीही माहिती नाही. तसेच बससेवा बंद का? याबद्दल प्रवाशांना कुठलीच ठोस माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे बससेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
chandwad| चांदवडमध्ये हुंडाबळी..; त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
एसटी महामंडळाचे लाखोंचे नुकसान
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने सुरु असून याचे पडसाद नाशिकमध्ये देखील पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील असंख्य गावात राजकीय नेत्यांना गावबंदी तर उपोषण सुरु करण्यात येत आहेत. असं असताना राज्यातील काही भागात मात्र आंदोलनांचे तीव्र पडसाद उमटू लागलेले आहेत. नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील मार्लेगांव जवळ काल रात्री अज्ञात लोकांनी एसटी बस थांबवून बस पेटवून दिली होती. तर, रविवारी पुन्हा एका बसवर दगडफेक करण्यात आली. नांदेडच्या माहूर तालुक्यातील आष्टा फाटा इथे अज्ञात मंडळीने एसटी बसेसवर दगडफेक केल्याचे देखील समोर आलं आहे. यात एसटी बसेसच्या काचा फुटून नुकसान झाल्याने खबरदारीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील एसटी बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता नाशिक डेपोतून सुटणाऱ्या मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.
नाशिकमध्ये काही ठिकाणी रास्तारोको
आंदोलन सुरु असल्याने बस सेवेवर परिणाम झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज आक्रमक झालेलं अआहे. त्यातच नाशिकमध्ये काही ठिकाणी रास्तारोको देखील सुरु झालेल आहे. यामुळे नाशिक मधून मराठवाड्याला जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासन पुढील सर्व निर्णय घेत आहे. या मार्गावरील बस सेवा बंद असल्याची माहिती प्रवाशांना बसस्थानकावर घोषणा करत देण्यात येत आहे जेणेकरून कोणत्याही प्रवाशाची गैरसोय होऊ नये. –किरण भोसले (जिल्हा परिवहन कार्यालय)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम