NMC Hospital Recruitment | दुसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा प्रतिसाद नाहीच! कारण नक्की काय?

0
17

NMC Hospital Recruitment | महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि स्टाफ नर्सची कमतरता भरून काढण्यासाठी 56 डॉक्टर आणि 40 सहाय्यक असे एकूण 96 जागा मानधनावर भरल्या जाणार आहेत. त्यासाठी गुरुवारी (ता.२६) दुसऱ्या दिवशीदेखील डॉक्टर पदासाठी प्रतिसाद मिळालेला नाही. स्टाफ नर्स आणि एएनएम पदासाठी दोन दिवसात 834, तर बीएएमएससाठी 301 अर्ज वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झालेले आहेत.

Onion | दर आहे पण कांदाच नाही; कांद्याचे दर वधारले मात्र शेतकरी दु:खी

महानगरपालिकेच्या माध्यमातून 5 मोठे रुग्णालय, 30 शहरी आरोग्य केंद्रे चालविले जातात. आता त्यात नव्याने 105 आरोग्य उपकेंद्रांची भर पडणार आहे. महापालिकेच्या वैद्यकीय सेवेचा विस्तार मोठा असला तरी डॉक्टर आणि अन्य पदांचा मोठा बॅकलॉग आहे. डॉक्टरांची सध्या 189  पदे मंजूर असली तरी सध्या 65 डॉक्टर कार्यरत आहे. 124 पदं रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची 61 पदं रिक्त आहेत. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी मानधनावर नियुक्ती करण्यासाठी जाहिरात काढण्यात आली होती.

त्यात 54 डॉक्टर आणि  40 सहाय्यकांची पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टर आणि एमबीबीएस डॉक्टरांच्या पदाकडे उमेदवारांनी मात्र पाठ फिरविली. शल्यचिकित्सकाच्या दोन पदांसाठी तीनच अर्ज प्राप्त झाले. तर अस्थिरोगतज्ज्ञ चार पदांसाठी आणि भूलतज्ज्ञांच्या दोन पदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. स्रीरोगतज्ज्ञांच्या पाच पदांसाठी आठ अर्ज दाखल झाले आहेत. रेडिओलॉजिस्टच्या दोन जागांसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही.

NMC Election | आधी लोकसभा; त्यानंतरच होणार महापालिका निवडणुका

बालरोगतज्ज्ञांच्या पाच जागांसाठी सहा अर्ज दाखल झालेत. कान-नाक-घसा तज्ज्ञांच्या दोन जागांसाठी 2 तर दंत शल्यचिकित्सकांच्या 3 जागांसाठी ७० अर्ज दाखल झालेत. वैद्यकीय अधिकारी (MBBS) च्या दहा जागांसाठी अवघे दोन अर्ज दाखल झालेत. वैद्यकीय अधिकारी (BAMS) च्या दहा जागांसाठी तब्बल 301 अर्ज दाखल झालेत. जीएनएम पदाच्या वीस जागांसाठी 274 अर्ज दाखल झालेत. तर एएनएमच्या वीस जागांसाठी 560 अर्ज दाखल झालेत.

You May Like


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here