Teacher Recruitment| राज्यात ३० हजार रिक्त शिक्षकांची भरती लवकरच; दीपक केसरकर

0
24

Teacher Recruitment| २३ जिल्ह्यातील रिक्त शिक्षकांच्या पदभरतीची लवकरच जाहिरात काढण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. राज्यात शिक्षकांच्या ३० हजार पदांची लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामुळे आता लाखो उमेदवारांचं ह्या रिक्त पदांच्या जाहिरातीकडे लक्ष लागले आहे.

राज्यात ३० हजार शिक्षकांच्या पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आतापर्यंत बिंदूनामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या २३ जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच दिली आहे. राज्यात पवित्र संकेतस्थळावरुन  ही शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. काही वर्षांपासून राज्यभरात शिक्षक भरती प्रक्रिया खूप दिवसांपासून रखडलेली होती. पण अखेर आता  शिक्षक भरती प्रक्रियेला मुहूर्त लागला असून २३ जिल्ह्यांत रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठीची जाहीरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यासंदर्भातील तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नसली, तरी तातडीची पाउलं राज्य सरकारकडून व शिक्षण विभागाकडून उचलण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

Sugar Export Ban| अखेर साखर निर्यातीवर बंदी; केंद्र सरकारचा निर्णय…

आतापर्यंत बिंदूनामावली सोबतच इतर काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहितीही मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिली आहे. तसेच, राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेबाबतची संकेतस्थळ असलेल्या पवित्र ह्या संकेतस्थळामार्फत ही संपूर्ण प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहितीदेखील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिली आहे.

भरती प्रक्रियेतील घडामोडींना वेग 

राज्यातील लाखो उमेदवारांचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांतील रिक्त पदांच्या भरती संदर्भातील जाहीरातीकडे लागलं आहे. दरम्यान, अशातच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे शिक्षण परिषदेसाठी पुण्यात आले होते. त्याचवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सध्या शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भातील घडामोडींना वेग आल्याचंदेखील  बघायला मिळत आहे.

IND vs BAN | पुण्यातील सामन्यात नक्की कोण मारणार बाजी?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here