कांद्याचे दर पाडण्यासाठी केंद्राची बैठक ?

0
2

देशातील विविध बाजार समित्यांमध्ये कांदा आवक घटल्याने मंगळवारीदेखील (दि.१७) नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांदा ३००० ते ३७०० रुपये क्विंटल दराने विक्री झाला. राज्यातील शेतकरी टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीस आणत आहेत. त्यामुळे वाढते दर, ग्राहकांची मागणी, नाफेड आणि NCCF कडे उपलब्ध असलेले कांदा याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा हे बुधवारी (दि.१८) दिल्लीत आढावा घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून कांदा आवक घटल्याने दरात क्विंटलमागे थेट 800 ते 1000 रुपयांनी वाढ झाली आहे. मंगळवारीही कांदा आवक कमीच होती यामुळे दरात पुन्हा 150 रुपयांनी वाढ होऊन क्विंटलला 3700 रुपये दर पोहोचले होते. आवक वाढू नये म्हणून शेतकरीही टप्प्याटप्प्याने बाजारात कांदा विक्रीला आणत आहे.

Teacher Recruitment| राज्यात ३० हजार रिक्त शिक्षकांची भरती लवकरच; दीपक केसरकर

नाफेडच्या अधिकाऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून कांदा खरेदी केला आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांना 56 टक्के रिकव्हरी द्यायची आहे. त्यानंतर पुन्हा तीन वेळेस नाफेडकडून खरेदी करण्यात आलेली आहे. नाफेडच्या संशयास्पद कारभारामुळे फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि नाफेडचा कारभार अडचणीत येण्याची दाट शक्यता दिसत आहे.
पिंपळगाव बसवंत बाजारसमितीमध्ये आज (दि. १८ ऑक्टोबर) रोजी सकाळच्या सत्रात साडे तेरा हजार क्विंटल उन्हाळी कांंदा आवक होऊन सरासरी  कांदा बाजारात 3400 रुपये प्रति क्विंटल होते. लासलगाव विंचूर बाजारसमितीमध्ये सकाळच्या सत्रात 4 हजार क्विंटल कांदा आवक होऊन भाव सरासरी 3450 होते. धुळे आणि जळगावला लाल कांद्याची थोड्या प्रमाणात आवक होत असून सरासरी 2500 ते 2700 रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव मिळत आहे.

Sugar Export Ban| अखेर साखर निर्यातीवर बंदी; केंद्र सरकारचा निर्णय…

(दि. १५) ऑक्टोबरपूर्वी संपलेल्या आठवड्यात लासलगाव बाजारात कांद्याचे सरासरी बाजारभाव 2464 रुपये प्रति क्विंटल असल्याची माहिती कृषी विभागाच्या पुणे येथील बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम कक्षाने नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे. या माहितीनुसार या सरासरी बाजारभावात दोन आठवड्यापूर्वीच्या तुलनेत दहा टक्के वाढ झालेली आहे. एकूण देशभरातील कांदा आवकेत मागच्या आठवड्यात 16 टक्के घट झालेली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here