Ahmednagar : अहमदनगर- आष्टी रेल्वेला वाळूंज येथे भीषण आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही आग पहिल्या दोन डब्यांना लागली होती आणि नंतर ती पुढे पाच डब्यांपर्यंत पोहोचली. सुदैवाने, रेल्वेत गर्दी नसल्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले होते. आगीमुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाल्याचेदेखील सांगितले जात आहे. आगीचे प्रमाण वाढल्यानंतर एकूण गार्ड ब्रेक कोच आणि चार डबे असे एकूण पाच डब्यांना आग लागली होती. चार वाजेच्या सुमारास आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश मिळालं.
अहमदनगर आणि आष्टी मार्गावरील ह्या रेल्वेला नेमकं कोणत्या कारणामुळे आग लागली हे अजून समजल नाही. आग नेमकी कशामुळे लागली?, याचा शोध रेल्वे प्रशासन घेत आहे. दुपारी ३ वाजून २४ मिनिटांनी ही आग लागल्याचे कळाले आहे. अग्निशमन दल हे लगेचच घटनास्थळी दाखल झाले होते. शर्थीच्या प्रयत्ननानंतर आग विझवण्यात त्यांना ४ वाजेच्या दरम्यान यश आलं. दरम्यान, गाडीतील प्रवासी वेळेत खाली उतरल्यामुळे ते सुखरूप आहेत. अहमदनगर आणि आष्टी दरम्यान शिराडोह भागात रेल्वेच्या दोन डब्यांना ही आग लागली होती. नगर- आष्टी दरम्यानच्या रेल्वेला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नसल्यामुळे प्रवाश्यांची संख्या कमी होती. यामुळे या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
chandwad | चांदवडच्या स्वयंभू रेणुका मातेच्या पालखीची परंपरा…
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार ३ वाजून २४ मिनिटांनी नगर तालुक्यातील वाळुंज येथे आष्टी- अहमदनगर ट्रेनला ही आग लागली होती. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, तसेच पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते.
ह्या मार्गावर सुरवातीला दोन गाड्या सोडण्यात येत होत्या. मात्र प्रवाशांचा कमी प्रतिसाद असल्याने आता सकाळी एकच गाडी सोडण्यात येते. दरम्यान, सोमवारी सकाळी अहमदनगरहून ही गाडी आष्टीला गेली असता, तिकडून परत येताना नगर तालुक्यातील वाळूज या गावाजवळ ट्रेनला आग लागली.
आग नेमकी कशामुळे लागली हे समजलेले नाही. आग लागल्याचे समजताच गाडी थांबवली गेली. इंजिनच्या मागच्या दोन डब्यांनी पेट घेतला होता. याची माहिती नगरला कळविण्यात आली. त्यानंतर रेल्वेचे अधिकारी तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अखेर ४ वाजता आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.(Ahmednagar Ashti Train )
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम